‘मटा’च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांची कित्येक अजरामर गाणी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. काळ कितीही बदलला तरी त्यांची गाणी आपल्याला आजही तितकीच भावतात, ही गाणी मनात घर करून राहिली आहेत’, असे यावेळी फडणवीस यांनी नमूद केले.
आजकल तेरे मेरे चर्चे हर जुबाँ पर …
‘सुमनताईंनी १३ भाषांत गाणी गायली आहेत. परंतु त्यातील कोणत्या गाण्याला चांगले म्हणावे, असा प्रश्न आमच्यासमोर येतो तेव्हा आमच्यासमोर येणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरेही आम्हाला त्यात सापडतात. जेव्हा आमच्याकडे अनेक पक्ष येतात तेव्हा, तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबाँ पर, असे म्हणावेसे वाटते… जेव्हा आम्ही जागावाटपाच्या चर्चेत बसतो तेव्हा म्हणावेसे वाटते की, तुम्हे प्यार करते है, करते रहेंगे … आणि जेव्हा निवडणुका पार पडतील तेव्हा आमचे विरोधक म्हणतील जिंदगी इम्तिहान लेती है …’, असे फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हणताच संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘जगात भारतीय शास्त्रीय संगीत नेले आहे. सॅन फ्रॅन्सिस्कोसारख्या ठिकाणी अकादमी सुरू करून भारतीय अभिजात संगीत केवळ पोचवणे नाही तर त्याचे महात्म्यही पोहोचवणे, ही खूप मोठी गोष्ट आहे’, असे गौरवोद्गार यावेळी फडणवीस यांनी ‘युथ आयकॉन’ पुरस्कारप्राप्त महेश काळे यांच्याविषयी काढले. तर ‘राहीबाई या वसुंधरेची सेवा करत-करत पारंपरिक बीज जपले आणि त्याचे संवर्धन करून पुढच्या पिढ्यांकडे पोचवण्याचे मोठे कार्य करत आहेत. आज आपण पर्यावरणीय बदलांमुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात आहोत. अशावेळी बीजमाता किताब त्यांना जो मिळाला आहे, ती खरोखरच मोठी सेवा आहे’, अशा शब्दांत फडणवीस यांनी राहीबाई यांचा गौरव केला.