• Mon. Nov 25th, 2024
    गडकरींनी दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारुन मविआत यावं, जिंकवण्याची जबाबदारी आमची, ठाकरेंचं आवाहन

    लातूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुरुवारी शेलक्या भाषेत टीका केली. मणिपूर, काश्मीरमध्ये जाण्याची तुमची हिंमत नाही आणि संभाजीनगरला येऊन फणा काढला आहे, असे ठाकरे शहा यांना उद्देशून म्हणाले. ‘आमची तीन चाकाची रिक्षा पंक्चर झाली म्हणता; पण तुमच्या ट्रिपल इंजिनच्या सरकारला भ्रष्टाचारी डबे असल्याचे का नाही सांगत,’ असा हल्लाबोल त्यांनी केला. गडकरी, तुम्ही दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच महाविकास आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले.

    औसा इथे झालेल्या जनसंवाद यात्रेच्या वेळी ठाकरे बोलत होते. या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थिती होते.

    भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, ‘नरेंद्र मोदी आज ‘मेरा परिवार’ अशी घोषणा देत आहेत. मी मुख्यमंत्री असताना ‘माझा परिवार, माझी जबाबदारी’ म्हटले आणि जबाबदारीही घेतली होती. तुमच्या परिवाराची जबाबदारी तुम्ही घेता का? ‘काँग्रेसने सत्तर वर्षांत काय केले’ अशी घासलेली रेकॉर्ड वाजवणाऱ्यांनी काय केले…तर निवडणूक रोख्यांतून सहा-सात हजार कोटी मिळवले आणि काँग्रेसला सहा-सातशे कोटी मिळाले असल्याचे सांगितले.’
    धनुष्यबाण नाही, तर कमळावर लढण्याची तयारी; पण तिकीट द्या, बारा खासदारांचं शिंदेंना साकडं
    ‘बाळासाहेब ठाकरे यांनी अटलजींना विनंती करून नरेंद्र मोदींना वाचवले नसते; तर ना नरेंद्र मोदी दिसले असते, ना अमित शहा दिसले असते,’ अशी टीकाही ठाकरे यांनी केली. ‘आपल्या राजकीय बापावर विश्‍वास ठेवून त्यांचे फोटो लावून मते मागा. आमच्या बापाचा, शिवसेनाप्रमुखांचा फोटो का लावता,’ असा सवाल त्यांनी केला.
    भाजप ‘खूपच मोठा’ भाऊ! राज्यात ३७ जागा लढण्याचे संकेत, मुंबईत ५ मतदारसंघांवर डोळा, शिंदेंना काय?
    ‘औसा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा होता. त्या वेळी मुख्यमंत्र्याच्या ‘पीए’ला पाहिजे म्हणून आम्ही माणुसकी म्हणून तो सोडला होता. आता हा मतदारसंघ आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघ हे शिवसेनेचे आहेत. हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनाच लढवणार,’ असे ठाकरे यांनी घोषित केले.

    कोण जय शाह? त्याचं कर्तृत्व काय? घराणेशाहीच्या आरोपावरून उद्धव ठाकरेंनी अमित शाहांनाच सुनावलं

    अंबादास दानवे म्हणाले, ‘पाणंद रस्तेविकास ही योजना उद्धव ठाकरे यांनीच मंजूर केली होती. शिवसेनेचे सरकार आल्यानंतर टेंभी प्रकल्प सुरू करू.’ लातूर जिल्ह्यात होणार असलेल सोयाबीन संशोधन केंद्र परळीला होत आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागील वेळेपेक्षा आपण एक तरी अधिक मत घेऊन विजयी होणार असल्याचे सांगून स्वतःची उमेदवारी घोषित केली.
    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    ‘गडकरी, तुम्ही मविआमध्ये या’

    ‘काळी संपत्ती गोळा करणाऱ्या कृपाशंकरसिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र, भाजप वाढविण्यात हयात गेलेल्या नितीन गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. गडकरी तुम्ही दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच महाविकास आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले. जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *