• Mon. Nov 25th, 2024
    अखेर वनवास संपला; ‘या’ ग्रामीण क्षेत्रातील १४ गावांचा नवी मुंबई मनपात समावेश

    डोंबिवली: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांचा गेल्या कित्तेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. अखेर शासनाने गुरुवारी १४ गावे नवी मुंबई मनपात समाविष्ट करण्याची अंतिम अधिसूचना जाहीर केली असून १४ गावांचा नवी मुंबई मनपा प्रवेशाचा वनवास आता संपला आहे. त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील आणि १४ गाव विकास समितीकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बाम्मली, नारीवली, बाळे, नागांव, भंडार्ली, उत्तर शीव, गोठेघर अशी गावांची नावे आहेत.कल्याण ग्रामीण भागात असलेल्या १४ गावांचा नवी मुंबई प्रवेशासाठी संघर्ष सुरु होता. सलग सहा वेळा लागलेल्या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर विकास समितीने बहिष्कार टाकून आपली एकजूट दाखवली होती. सतत ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकून शासनाला निर्णय घेण्यास समितीकडून भाग पाडण्यात आलं होतं. १४ गावांचा नवी मुंबई प्रवेशाचा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी १४ गावं नवी मुंबई मनपात समाविष्ट करण्याची घोषणा देखील केली होती. मात्र गावं समाविष्ट करण्यासाठी शासनाने अधिसूचना काढली नसल्याने त्याबाबत पाठपुरावा देखील शासन स्तरावर १४ गावं विकास समिती आणि मनसेचे आमदार राजू पाटील हे करत होते.
    मुरलीधर मोहोळ यांचं तिकीट फायनल झाल्याची कुणकुण, जगदीश मुळीक तातडीने फडणवीसांच्या भेटीला
    नुकत्याच ठाणे जिल्ह्यात झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा देखील केली होती. त्यानंतर गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,कल्याण लोकसभेचे खा. डॉ.श्रीकांत शिंदे, १४गाव विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांसह १४ गावं विकास समितीची मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत १४ गावं नवी मुंबईत समाविष्ट करण्याची अधिसूचना शासनाकडून जाहीर करण्यात आली असल्याचे विकास समितीचे अभिनंदन व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्थानिक आमदार राजू पाटील यांनी आभार व्यक्त केलं आहे. १४ गाव नवी मुंबई मनपात समाविष्ट केल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी विकास समिती सोबत आनंद साजरा केला आहे. यावेळी एकमेकांना पेढे भरवून १४ विकास समिती सोबत त्यांनी आनंद साजरा केला असल्याचे दिसून आलं आहे.

    नवी मुंबई महानगरपालिकेत प्रवेशासाठी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील १४ गावांनी ग्रामपंचायत निवडणुकांवर सहा वेळा बहिष्कार टाकला होता. मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर १४ गाव विकास समितीला सोबत घेऊन अनेक वेळा पाठपुरावा करून अधिवेशनात प्रश्न देखील उपस्थित केला होता. त्यावेळी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी १४ गावं नवी मुंबई मनपात समाविष्ट करण्याची घोषणा केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणी येत असल्याने शासनाची अधिसूचना निघाली नव्हती. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर आज शासनाने १४ गाव नवी मुंबईत समाविष्ट करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. १४ गावांच्या एकजुटीचा खऱ्या अर्थाने आज विजय झाला आहे. मी १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीचे,नागरिकांचे अभिनंदन आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, असं आमदार राजू पाटील यांनी सांगितलं.

    वर्धापन दिनासाठी राज ठाकरे नाशकात येण्यापूर्वीच अज्ञातांनी मनसेचे बॅनर फाडले

    १४ गावांमध्ये जे भूमीपूत्र आहेत, गावकरी आणि रहिवाशी आहेत यांची मागणी होती १४ गावांचा समावेश नवी मुबंई महानगरपालिकेमध्ये केला पाहिजे. आज तसा निर्णय माननीय मुख्यमंत्री यांनी त्याठिकाणी घेतला. त्याचा जीआर देखील नोटिफिकेशन देखील यावेळी काढण्यात आले आहे. आणि १४ गावं नवी मुबंई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेतले आहे. आता त्याठिकाणी आता त्याठिकाणची डेव्हलपमेंट ही नवी मुंबईमध्ये जशाप्रकारे होते तशीच १४ गावांमध्ये देखील होईल, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed