• Mon. Nov 25th, 2024

    कार्यक्रमाच्या जाहिरातीत आमदारांनी खासदारांचा फोटो डावलला, लोकप्रतिनिधींमधील वाद चव्हाट्यावर

    कार्यक्रमाच्या जाहिरातीत आमदारांनी खासदारांचा फोटो डावलला, लोकप्रतिनिधींमधील वाद चव्हाट्यावर

    जळगाव: चाळीसगाव येथे आज आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकास कामांच्या निधीतून जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाच्या जाहिराती आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र या जाहिरातींवर खासदार उन्मेष पाटील यांचा फोटो डावल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये एकमेकांच्या कुरघुड्या करणे, ऐन लोकसभेच्या निवडणुकीत सुरू झाले आहे.
    महायुतीमध्ये नवा फॉर्म्युला; जागा तुम्हाला पण उमेदवार भाजपचा, शिंदेच्या खासदारांच्या हाती कमळ?
    आमदार मंगेश चव्हाण आणि खासदार उन्मेष पाटील यांचे राजकीय वैर अनेक दिवसांपासून जिल्हा वासियांना ज्ञात झाले आहे. आज चाळीसगाव शहरात आमदार मंगेश चव्हाण यांच्या निधीतून विकास कामांच्या उद्घाटन तसेच भूमिपूजन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्त आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहिराती दिल्या आहेत. या जाहिरातीवर स्थानिक खासदार उन्मेश पाटील यांचा फोटो डावल्याने भाजपातील दोघ लोकप्रतिनिधींचे राजकीय वैर चव्हाट्यावर आले आहेत.आमदार मंगेश चव्हाण व खासदार उन्मेष पाटील हे भाजप पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. चाळीसगाव तालुक्याने दोन तरुण युवक प्रतिनिधी नेमून दिले. मात्र या प्रतिनिधींनी एकमेकांचे पाय ओढण्याची जणू स्पर्धा सुरू केली आहे. यामुळे चाळीसगाव शहरात भाजपात एक मत नसल्याचे दिसून येत आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार उन्मेश पाटील यांचे तिकीट नाकारून त्यांना जळगाव लोकसभेचे उमेदवारी देण्यात आली. याला कारण होते चाळीसगाव शहरात मंगेश चव्हाण यांना आमदारकीचे तिकीट हवे असल्याने खासदार उन्मेष पाटील यांना जळगाव लोकसभेचे तिकीट दिले. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांना चाळीसगाव विधानसभेचे उमेदवारी देण्यात आली. या दोघांचे राजकीय वैर सुरू झाले.

    वर्धापन दिनासाठी राज ठाकरे नाशकात येण्यापूर्वीच अज्ञातांनी मनसेचे बॅनर फाडले

    खासदार उन्मेष पाटील हे लोकसभेचे तिकीट घेण्यास फारसे इच्छुक नव्हते. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे त्यांना नाईलाजास्तव उमेदवारी घ्यावी लागली. यामुळेच आमदार मंगेश चव्हाण यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिले. त्यापासून आमदार मंगेश चव्हाण आणि खासदार उमेश पाटील यांच्यात राजकीय वैर दिसून आले. जाहिरातींमध्ये खासदार उन्मेष पाटील यांचा फोटो डावलल्याने ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात राजकीय मतभेद चव्हाट्यावर येत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष या दोन्ही लोकप्रतिनिधींना तंबी देऊन राजकीय वैर चव्हाट्यावर येऊ देऊ नका, अशा सूचना देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *