• Mon. Nov 25th, 2024
    सुनील शेळके धमकीप्रकरणात फडणवीसांची उडी, म्हणाले, साध्या आमदाराला…

    पुणे : शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके इशाराऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेतली असल्याचे पहायला मिळत आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत पण त्यांनी एका साध्या आमदाराला धमकी देणं म्हणजे ते त्यांचा स्तर खाली आणत आहेत, मला त्यांचं विधान अजिबात पटलेलं नाहीये, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याचवेळी मी त्यांना सल्ला द्यायला मोठा नेता नाही, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

    देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी मावळमधील शरद पवार vs अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांमधील सुंदोपसुंदी तसेच शरद पवार यांनी शेळके यांच्यावरील टीकेचा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी पवारांवर जोरदार टीका केली.
    “सुनील शेळके, तू आमदार कुणामुळे झालास? तुझ्या अर्जावर माझी सही… मला शरद पवार म्हणतात”

    साध्या आमदाराला धमकी देत असतील तर….

    फडणवीस म्हणाले, खरं तर पवार साहेब मोठे नेते आहेत. त्यांना राजकारणात जवळपास ५५ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र एवढ्या मोठ्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर ते योग्य नाही. मी त्यांना सल्ला देण्याएवढा मोठा नाही पण त्यांनी याचा पुर्नविचार करावा. शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि ते साध्या आमदाराला धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं त्यांचा स्तर आहे तो खाली येईल, असं फडणवीस म्हणाले. जाताजाता पत्रकारांच्या आधारावर मी हे बोलतोय, असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.
    ८ दिवसांत पुरावे द्या नाहीतर महाराष्ट्रभर शरद पवार खोटे आरोप करतायेत असं सांगेन : सुनील शेळके

    दरम्यान, फडणवीसांच्या टीकेवर आता शरद पवार काय भाष्य करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आज शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यामुळे मावळमध्ये राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. लोणावळा येथील राष्ट्रवादीचा मेळावा यानिमित्ताने चर्चेत आल्याचे पहायला मिळाले.

    माझ्यावरच्या आरोपांमध्ये तथ्य काय? सुनिल शेळकेंचा शरद पवारांना सवाल

    शरद पवार नेमकं आमदार शेळकेंना काय म्हणाले?

    आजच्या मेळाव्याला जाऊ नका, अशी धमकी आमदारांनी कार्यकर्त्यांनी दिल्याचं ऐकलं. मी त्यांना सांगू इच्छितो, एकदा दमदाटी दिली तर बस्स, पुन्हा जर असं काही केले तर, ‘शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्याने कधी जात नाही. पण, त्या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर सोडतही नाही, असा इशाराच शरद पवार यांनी सुनील शेळके यांना दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed