• Sat. Sep 21st, 2024

आता बास झालं तुला नक्की पडणार , भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना कुणी दिला इशारा

आता बास झालं तुला नक्की पडणार , भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना कुणी दिला इशारा

पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार काही ठरत नाही. भाजपकडून माजी खासदार संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक हे नावं शर्यतीमध्ये आहेत. मात्र, उमेदवारी मिळवण्यासाठीचा खरा सामना मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्यातच प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. भाजपने आपला उमेदवार ठरवण्यासाठी तब्बल चार सर्व्हे केले आहेत. अजूनही उमेदवार कोण असेल यावर एकमत झालं नाही, अशातच आता भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.भाजपतर्फे उमेदवारीच्या शर्यतीत सर्वात पुढे असणारे मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आता भाजप कार्यकर्तेच आक्रमक झालेले दिसत आहेत. पुणे महापालिका आवारात मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘स्टँडिंग दिली, महापौर दिलं, सरचिटणीस बनवलं. खासदारकी पण देणार? आता बस झालं… तुला नक्की पाडणार’ अशा आशयाचे बॅनर पुणे महानगरपालिका आवारात लावण्यात आले होते. अज्ञातांनी हे बॅनर लावले असले तरी बॅनर वर ‘कष्टाळू भाजप कार्यकर्ते’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे भाजपचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसत आहे.
कृपाशंकर सिंह पुण्यात, लोकसभा उमेदवारीसाठी ६० जणांशी वैयक्तिक चर्चा, सात वाजताची डेडलाईन
या बॅनरबाजीवर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘ निवडणुकीपूर्वी शहरातील वातावरण दूषित करण्याचा हा प्रकार आहे. अशा पद्धतीचे बॅनर झळकावून उमेदवारी देण्याबाबतच्या निर्णयात कोणताही फरक पडत नसतो. हा प्रकार बालिशपणाचा आहे. पण मी एक ठामपणे सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाची ही संस्कृती नाही. हा बॅनर लावण्याचा प्रकार विरोधकांनी केला असावा, अशा पद्धतीचे बॅनर लावून एखाद्याची इमेज डगमगू शकत नाही. उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो त्यामुळे असे बॅनर लावून उमेदवारी देण्यावर काहीच परिणाम होणार नाही.’ असं धीरज घाटे म्हणाले आहेत.
सहा इच्छुक, ६६ जणांशी चर्चा, दोन नावं शॉर्टलिस्ट, पुणे लोकसभा उमेदवारीसाठी भाजपचा काथ्याकूट
दुसरीकडे, समाज माध्यमांवर आता कोथरूडला इतकं दिल असताना खासदारकी देखील का द्यायची? असा मेसेज भाजप पदाधिकाऱ्याच्या नावाने फिरत आहे. नितीन मुळीक भाजप सदस्य पुणे व भाजप सेवा प्रकोष्ट कार्यकारिणी सदस्य पुणे शहर व भारत तिबेट सहयोग मंच पुणे महानगर, महामंत्री यांच्या नावाने हा मेसेज समाज माध्यमावर फिरत आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
घरात लग्नाला विभक्त कुटुंबही एक होतं; मतभेद असले तरी चर्चेने सोडवू, चंद्रकांतदादांचं स्पष्टीकरण

काय आहे मेसेज?

‘भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना नम्र विनंती की कृपया पुणे शहर लोकसभा मतदार संघासाठी कोथरुड भागात ला सोडून इतर कोणत्याही भागातील उमेदवार द्यावा. कोथरूडचे प्रतिनिधित्व करणारे एक कॅबिनेट मंत्री पदी आहेत. नुकत्याच राज्यसभेवर देखील एक महिला खासदार झाल्या आहेत. इतर भागातील कार्यकर्त्यांना व पक्षातील निष्ठावंताना न्याय मिळावा. पुणे शहर भागातील जनतेला खासदाराला भेटायला संपूर्ण शहर ओलांडून कोथरुडला जाणे गैरसोयीचे आहे. तेव्हा कोथरुडला कृपया पूर्ण विराम द्यावा.

प्रेषक
नितीन मुळीक भाजप सदस्य पुणे व भाजप सेवा प्रकोष्ट कार्यकारिणी सदस्य पुणे शहर व भारत तिबेट सहयोग मंच पुणे महानगर, महामंत्री.

त्यामुळे सुरुवातीला या पद्धतीचा समाज माध्यमावर फिरणारा मेसेज आणि त्यानंतर थेट महापालिका आवारातच लावण्यात आलेले बॅनर त्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली इतकं नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed