• Mon. Nov 25th, 2024

    गरजू महिलांना पैशांचे आमिष अन् देहव्यापाराची बळजबरी, माहिती मिळताच पोलिसांचा छापा, चार महिलांची सुटका

    गरजू महिलांना पैशांचे आमिष अन् देहव्यापाराची बळजबरी, माहिती मिळताच पोलिसांचा छापा, चार महिलांची सुटका

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: सक्करदरा परिसरातील संगम टॉकीज मार्गावरील के. सी. फॅमिली सलूनमध्ये महिलांना आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याचे उघडकीस आले. गुन्हेशाखा युनिट चारच्या पथकाने सापळा रचून सलून चालविणाऱ्या महिलेला ताब्यात घेत तिच्या तावडीतून चार महिलांची सुटका केली.
    गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याची माहिती गुन्हेशाखेला प्राप्त झाली. पोलिसांच्या पथकाने नंदवनन येथे राहणारी सलूनची मालक शिला कैलास भोवते (वय ३८ वर्षे) हिला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. आरोपींकडील दीड हजार रुपये रोख, एक मोबाइल आणि इतर साहित्य असा एकूण ११ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ग्राहकांकडून पैसे घेऊन देहव्यापारासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे तपासात पुढे आले. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक अयुब संदे, पोलिस उपनिरीक्षक वैभव बारंगे, अविनाश जायभाये आदींनी ही कारवाई केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed