• Sat. Sep 21st, 2024

अमित शाहांकडून परिवारवादावर धूळफेक पण व्यासपीठावरील घराणेशाही पाहयाला विसरले: अंबादास दानवे

अमित शाहांकडून परिवारवादावर धूळफेक पण व्यासपीठावरील घराणेशाही पाहयाला विसरले: अंबादास दानवे

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाह यांना उत्तर देताना अंबादास दानवे यांनी भाजपमधील घराणेशाहीची यादीचं पोस्ट केली आहे. अंबादास दानवेंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल परिवारवादावर बरीच धूळफेक केली. हे बोलताना ते मात्र स्वतः उभे असलेल्या व्यासपीठावर पाहायला विसरले. व्यासपीठावरील घराणेशाहीचे उदाहरण असलेली ही काही नावे असं म्हणत दानवेंनी भाजपमधील घराणेशाहीची उदाहरणं सांगितली यामध्ये शोभा फडणवीस – देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे – पंकजा मुंडे, शंकरराव चव्हाण – अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे – संतोष दानवे या नावांचा समावेश आहे. हे नेते तुमच्यासोबत असल्यानं तुम्ही यांच्याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन दिले होतं का? फडणवीसांकडून जलील टार्गेट

अंबादास दानवेंनी यापुढे जात भाजपसोबत असलेल्या काही पक्षांची नावं सांगितली आहेत. ज्यामध्ये त्या पक्षांचा पाया एक घराणं आहे. शिरोमणी अकाली दल (पंजाब), पासवान परिवार (बिहार), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (महाराष्ट्र), नॅशनल पीपल्स पार्टी (मेघालय), जनता दल सेक्युलर (कर्नाटक), राष्ट्रीय लोक दल (उप्र, राजस्थान) ही उदाहरणं अंबादास दानवे यांनी दिली आङेत.

अजून बऱ्याच आहेत! या गोष्टी आम्हाला कशाला सांगता.. महाराष्ट्रात ठाकरे घराण्यावर लोकांनी प्रेम केले आहे. जोपर्यंत ठाकरे तुमच्यासोबत तोपर्यंत ते चांगले आणि विरोधात गेले की घराणेशाहीचा पुरस्कर्ते? ही डबल ढोलकी वाजवणे लोकांना दिसते. हा कावा महाराष्ट्रात चालणार नाही. ध्यानी असू द्या..वाऱ्या तुमच्या, पण वारे आमचेच आहे! म्हणत भाजपच्या घराणेशाहीचा पाढा वाचत अंबादास दानवेंनी अमित शाह यांच्यावर पलटवार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed