• Sat. Sep 21st, 2024
Ajit Pawar: करायचे तर एक नंबर नाही तर आपण त्याच्या नादाला लागत नाही- अजित पवार

बारामती : बारामतीत पोलिस उपमुख्यालय, पोलिस वसाहत, बस स्थानक या कामांच्या भूमीपूजनापासून ते आजवर मी किमान ४० वेळा तेथे भेट देऊन, पाहणी करत काम करून घेतले आहे. अभिमान वाटावा असे ही काम झाले आहे. पोलिस विभागाला ३९ वाहनेही आज दिली आहेत. करायचे तर एक नंबर नाही तर आपण त्याच्या नादाला लागत नाही. अजून विकासकामे करायची असून त्यासाठी शिंदे, फडणवीस यांनी साथ द्यावी, सहकार्य करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामतीला राज्यात क्रमांक एकचा तालुका केल्याशिवाय राहणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही राज्याच्या तिजोरीच्या चाव्याच तुमच्याकडे आहेत. विकासात सरकार आखडता हात घेणार नाही, अशी ग्वाही त्यांना दिली.

बारामतीत शासनातर्फे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, दिलीप वळसेपाटील, उदय सामंत, खा. शरद पवार, डॉ. नीलम गोऱ्हे, खा. सुप्रिया सुळे, आ. दत्तात्रय भरणे, सुनेत्रा पवार, आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधिक्षक पंकज देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती.

राज्यात नागपूर, लातूर, नगर येथे महारोजगार मेळावे झाले. त्याचे रेकॉर्ड तोडणारा कार्यक्रम बारामतीत होत आहे.अजित पवार यांनी त्याचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. बारामती हे विकासाचे मॉडेल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, येथील विकासात शरद पवार,अजित पवार यांचे योगदान आहे. कायम कार्यरत असणाऱ्या पोलिसांसाठी बारामतीत चांगली घरे उपलब्ध करून दिली आहेत. येथील शासकीय इमारती रोल मॉडेल आहेत. बारामतीचे बस स्थानक राज्यासाठी रोल माॅडेल ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed