• Sat. Sep 21st, 2024

बायकोला संपवलं मग सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पोलिसांत, कॉलर उडवत म्हणाला…

बायकोला संपवलं मग सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पोलिसांत, कॉलर उडवत म्हणाला…

छत्रपती संभाजीनगर: पतीचे महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेतल्याने पती पत्नीत कडाक्याचं भांडण झालं. यातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने चार वर्षाच्या मुलाला घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले. कॉलर उडवत मी पत्नीचा काटा कढल्याचं सांगत खून केल्याची कबुली दिली. ही घटना रांजणगाव शेणपुंजी येथील दत्तनगर फाटा जवळील गणेशनगरमध्ये घडली.

सुनीता मदन बेडवाल (वय ३०) असं मयत महिलेचे नाव असून मदन बाबुसिंग बेडवाल (वय ३१ रा गणेश नगर दत्तनगर फाटा रांजणगाव शेपू छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनचे मूळ गाव ओझर जालना आहे. सुनीता आणि मदन यांचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. मदन हा कंपनीत काम करतो.

सुनीताचा मदनसोबत लग्न होण्यापूर्वी दुसऱ्यासोबत विवाह झाला होता. मात्र, सुनीता आणि तिच्या पहिल्या पतीचं जमत नसल्याने ती माहेरी राहत होती. याचदरम्यान दोघांचे प्रेम जुळले आणि सुनीता चा मदनसोबत विवाह झाला. वाळूज परिसरात एका खोलीमध्ये आई-वडील तर एका खोलीमध्ये पती-पत्नी आणि मुलगा राहत होते. लग्नानंतर मदन सुनीता ला माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत होता. तर सुनीता मदनचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होती. यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. याचदरम्यान, पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला.

पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलिस आयुक्त महेंद्र देशमुख, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक गौतम वावळे, पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सचिन पागोटे, शिवाजी घोरपडे, अशोक इंगोले, आमलदार सुखदेव कोल्हे, योगेश शेळके,विक्रम वाघ, राजेंद्र उदे, सुरेश तारव, प्रशांत सोनवणे, रोहित चिंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पती मदन बाबुसिंग बेडवाल, सासरा बाबुसिंग बेडवाल, सासू सौ रुखमणबाई बाबुसिंग बेडवाल, दीर रामेश्वर बाबुसिंग बेडवाल यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed