• Tue. Mar 10th, 2026
    पालघरमध्ये दुहेरी हत्याकांड, कुदळीने वार करत डोक्याचा चेंदामेंदा, शहरात भीतीचं वातावरण

    पालघर : पालघरमध्ये अत्यंत निर्घृणपणे दोन जेष्ठ नागरिकांची हत्या केल्याची धक्कादायक घटना कुडण येथे घडली असून हत्या करून आरोपी फरार झाला. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. दलदल परिसरात लपून बसलेल्या या आरोपीला अवघ्या काही तासातच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अटक केली.पालघर तालुक्यातील कुडण येथे एका अज्ञात इसमाने दोन जेष्ठ नागरिकांवर हल्ला करून निर्घृणपणे त्यांची हत्या केली. भीमराव पाटील (वय ८०) आणि मुकुंद पाटील (वय ८५) या दोघांवर कुदळीने वार करून दोघांचेही चेहरे विद्रूप करत अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर बाजूला असलेल्या एका घरावर देखील या हल्लेखोराने हल्ला केला. त्यानंतर हा हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून या संपूर्ण घटनेनंतर परिसरात भीतीच्या वातावरण पसरले आहे.
    थोरवे-भुसेंमध्ये फ्री स्टाईल, १५-२० आमदारांनी पाहिलं, प्रकरणाची चौकशी करा, वडेट्टीवारांची मागणी, अजितदादांचा आवाज चढला!
    घटनेची माहिती मिळताच स्थानिक तारापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीने पोलिसांची पथके स्थानिकांसह रवाना करण्यात आली. हत्या करणारा आरोपी कुडण येथे असलेल्या तलावाच्या दलदल परिसरात लपून बसल्याचे माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने या हत्या करणाऱ्या आरोपीला गुरुवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास अटक केली.

    दोन व्यक्तींची निर्घृण करणारा व्यक्ती माथेफिरू असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून गेल्या दोन दिवसांपासून तो गावात फिरत असल्याचे देखील कळते. अटक आरोपीची चौकशी पोलिसांमार्फत सुरू करण्यात आली असून आरोपी सध्या कोणतीही माहिती देत नसल्याचे कळते. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed