• Sat. Sep 21st, 2024
आदिवासी म्हणून बोलू दिले जात नाही, नाराजी व्यक्त करत आमदार पाडवींचा सभात्याग

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: दिवसभर सभागृहात बसूनही बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत आमदार आमश्या पाडवी चर्चेदरम्यान गुरुवारी सभागृहातच खाली बसले. तालिका अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी आमदार विक्रम काळे यांना भाषण थांबवून पाडवी यांना बोलण्याची विनंती केली. मात्र आपल्याला आदिवासी असल्याने बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत सभात्याग केला.राज्य सरकारविरुध्द नियम २६० अंतर्ग विरोधी पक्षांनी प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर परिषदेतील सदस्यांची भाषणे बुधवार पासून सुरू होती. यात प्रस्तावावर बोलणाऱ्या वक्त्यांच्या यादी पाडवी यांचेही नाव होते. पाडवी बुधवारपासून सभागृहात बसून होते. मात्र त्यांना बोलण्याची संधी मिळालेली नव्हती. अखेर गुरुवारी सायंकाळी त्यांचा संयम सुटला. आमदार विक्रम काळे यांचे भाषण सुरू असतानाच ते सभागृहातच खाली बसले आणि मी खाली बसूनच भाषण ऐकेन, असे जाहीर केले.

संदेशखाली प्रकरण: टीएमसी नेता शहाजहा शेख याला अखेर अटक, स्थानिकांचा मिठाई वाटून जल्लोष
तालिका अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी त्यांना आसनावर बसण्याची विनंती केली. मात्र, आपल्याला बोलू दिले जात नसल्याची तक्रार पाडवी यांनी केली. यावर दराडे यांनी त्यांचे नाव पुकारत भाषण करण्याची विनंती केली. मात्र, आपल्याकडे आदिवासी समाजाचा असल्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची नाराजी व्यक्त करत पाडवी यांनी सभात्याग केला. हिवाळी अधिवेशनातही पाडवी यांनी अशाप्रकारे सभात्याग केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed