• Mon. Nov 25th, 2024
    ठाकरे गटाची युवासेना कार्यकारिणी जाहीर, दोन खासदारांच्या कन्यांसह १२ जणांची वर्णी

    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची युवासेना कार्यकारिणी जाहीर झाली आहे. सदस्यांमध्ये १२ जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये ठाण्याचे खासदार राजन विचारे, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या मुलींचा समावेश आहे. याशिवाय ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदे यांचीही कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांना युवासेनेचे सहसचिव पद देण्यात आले आहे.

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती जाहीर केल्याची माहिती आहे.
    नाना पटोलेंविरोधात पुन्हा असंतोष, १२ निष्ठावंतांची गुप्त बैठक, असंतुष्ट गट दिल्लीला रवाना
    शिवसेनेचे माजी खासदार आणि दिवंगत नेते मधुकर सरपोतदार यांचे नातू जय अतुल सरपोतदार, सिद्धेश सुनील शिंदे, धनश्री राजन विचारे, रुची विनायक राऊत यांचा प्रामुख्याने सहभाग कार्यकारिणीवर दिसून येतो.
    दिल्लीत भाजपच्या जोरबैठका, दोन वेळ खासदारांचा पत्ता कट होण्याची चर्चा, ‘स्वराज’कन्येला तिकीट?
    याशिवाय अभिषेक शिर्के, योगेश निमसे, दीपक दातीर, रायन मेनेझेस, अश्विनी पवार, अॅड. गुरशीन साहनी, प्रियंका जोशी, दीक्षा संखे-कारकर यांची युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

    जेव्हा नितेश राणे आणि आदित्य ठाकरे एकमेकांसमोर येतात

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    उपसचिवपदी हेमंत दुधवडकर, रणजित कदम, प्रथमेश सकपाळ, गीता कदम यांची तर सहसचिवपदी रोशनी शिंदे नियुक्ती केली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून मिळत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *