• Thu. Nov 28th, 2024

    लक्झरी लाईफस्टाईल, १७.४० लाखांचं रोलेक्स वॉच, हे सगळं येतं कुठून? समीर वानखेडे म्हणतात…

    लक्झरी लाईफस्टाईल, १७.४० लाखांचं रोलेक्स वॉच, हे सगळं येतं कुठून? समीर वानखेडे म्हणतात…

    मुंबई: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीनं मुंबईत ड्रग्जविरोधात मोठं अभियान हाती घेतलं. बॉलिवूडच्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची एनसीबीकडून चौकशी झाली. यानंतर कॉर्डेलिया क्रूझवरील कथित ड्रग्ज पार्टीचं प्रकरण चर्चेत आलं. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आयर्न खान सापडला. या कारवाईनंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे चर्चेत आले. त्यांच्याच नेतृत्त्वात एनसीबीच्या कारवाया सुरू होत्या. पण यानंतर वानखेडे विविध वादांमध्ये सापडले. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं.

    माझी ओळख ही केवळ एक केस नाही. अनेकदा मी माध्यमांना हेच सांगत असतो. समीर वानखेडे त्या एका केसपेक्षा बरंच काही आहे. मी तेच केलं, जे प्रत्येक अधिकारी करतो, असं वानखेडे म्हणाले. मुलाखतीत त्यांना त्यांच्या संपत्तीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर मी एका व्यावसायिक कुटुंबातून येतो. तुमच्या नावावर संपत्ती असेल, तर मी वर्दी घालू शकत नाही, अधिकारी होऊ शकत नाही, असा कोणताही कायदा नाही, असं वानखेडे म्हणाले.
    उत्तराखंड बोगदा दुर्घटनेतून वाचवले ४१ जणांचे प्राण; प्रशासनाकडून त्याचंच घर जमीनदोस्त
    पोलीस, प्रशासकीय सेवेते दाखल होण्यापूर्वी तुमची संपत्ती असल्यास तुम्ही ती जाहीर करू शकता. माझ्या कुटुंबाचे व्यवसाय आहेत. माझ्याकडे, आमच्याकडे असलेला पैसा खंडणीतून उकळण्यात आलेला नाही. तुम्ही कुटुंबासोबत ५ स्टार हॉटेलात जेवायला गेलात, तर तुम्ही त्याला बार म्हणणार का? बार शब्दाचा वापर बदनामीसाठी केला जातो. आमच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे. तो माझ्या आईच्या नावे होता. तिच्या निधनानंतर तो माझ्याकडे आला, असं वानखेडे यांनी सांगितलं.
    भाजपला स्वत:चे ‘नेते’ नको, हवेत राष्ट्रवादीचे ‘बाबा’; अजितदादा म्हणतात ना-ना; महायुतीत खटका?
    तुम्ही १७ लाख ४० हजारांचं रोलेक्सचं घड्याळ वापरतात, असा आरोप तुमच्यावर होतो, त्याचं काय, असा प्रश्न वानखेडेंना विचारण्यात आला. त्यावर ते घड्याळ पत्नी क्रांती रेडकरनं ते घड्याळ भेट म्हणून दिलं होतं, असं वानखेडे म्हणाले. ‘माझी पत्नी दिग्दर्शिका, चित्रपट निर्माती आणि लेखिका आहे. गेल्या २५ वर्षांपासून ती इंडस्ट्रीत काम करतेय. चित्रपट अभिनेत्री एक चांगलं आयुष्य जगू शकत नाही असं लोकांना वाटतं का? तसं असल्यास ते चुकीचं आहे. एखाद्याची जीवनशैली चांगली असेल, त्याच्या जीवनमानाचा दर्जा चांगला असेल तर तो काहीतरी चुकीचं करत असावा, असं वाटतं. प्रत्येक जण चुकीच्या मार्गानं पैसे कमावत असेल असं नाही. माझी आई शाही कुटुंबातून येते. त्यामुळे मला महागड्या वस्तू गैरमार्गानं घेण्याची गरज नाही,’ असं वानखेडे यांनी सांगितलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed