• Mon. Nov 25th, 2024
    कॉलेज सुरु असताना अचानक मधमाशांचा हल्ला, ५०हून अधिक विद्यार्थी जखमी

    सातारा : साताऱ्यामधील रामनगर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज परिसरात आज दुपारच्या सुमारास मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात ५०हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. यामुळे तात्काळ कॉलेज प्रशासनाने कॉलेज परिसर पूर्णपणे मोकळा केला आहे. अनेक वर्षापासून असणाऱ्या या आगी मोव्हांचे पोळे हटवण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. यामधील दोन विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मधमाशांनी चावा घेतल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.रामनगर जवळील असलेल्या केबीपी कॉलेजच्या छतावर अनेक दिवसापासून तीन मोठ्या आगी मोव्हांचे पोळे आहेत. परंतु आज बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास उन्हाच्या तडाख्याने मधमाशा अचानक उठलेल्या होत्या. या मधमाश्यांनी वर्गात व वरांड्यात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. यामुळे विद्यार्थ्यांची पळापळ होऊन अनेकजण यामध्ये जखमी झाले. ही घटना कॉलेज प्रशासनाच्या लक्षात येताच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. कॉलेजने लगेच विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन जखमींवर प्राथमिक उपचार केले. मधमाशांच्या हल्लामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या घटनेमुळे परिसरात चर्चा रंगू लागल्या असून याबाबत उपाययोजना करण्याची मागणी पालकांमधून जोर धरू लागली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed