• Fri. Jul 3rd, 2026

    फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 6, 2026
    फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट – महासंवाद

    मुंबई, दि. ६ : फिनलंडचे देशाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल ताज पॅलेस येथे भेट घेतली.

    या भेटी दरम्यान फिनलंडसोबत राज्याचे द्विपक्षीय संबंध, गुंतवणुकीच्या संधी, उद्योग, व्यापार, कौशल्य विकास आदि विषयी चर्चा करण्यात आली.

    यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उद्योग विभागाचे सचिव पी अन्बळगण, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे आदी उपस्थित होते.

    ०००

    निलेश तायडे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed