• Sun. Sep 22nd, 2024
धुळ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराची कीड, गावकऱ्यांचे अधिकाऱ्यांना चॅलेंज

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे ग्रामपंचायत येथे स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला १२ हजार रुपये प्रमाणे शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळत असते. मात्र, प्रत्यक्षात ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाही, असा आरोप करत सदर प्रकरणांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेवाळे ग्रामस्थांनी केला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी ग्रामस्थांनी अनेकदा केली होती.शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे ग्रामपंचायतमध्ये स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्याकरता शासनाकडून प्रत्येकी लाभार्थ्याला १२ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळत असते. मात्र, शेवाळे ग्रामपंचायतमध्ये प्रत्यक्षात अनेक लाभार्थ्यांपर्यंत कुठल्याही प्रकारचा निधी पोहोचला नाही. याउलट एका लाभार्थ्यांच्या नावे चार- चार प्रकरण टाकून असे गावातील ३००हून अधिक लाभार्थ्यांचे प्रकरण तयार करून लाखो रुपयांचा निधी लाटण्यात आला असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावकऱ्यांनी तर थेट अधिकाऱ्यांना चॅलेंज दिलं आहे की, यादीत नाव अशणाऱ्यांपैकी एकाच्या घरी तरी संडास दाखवा आणि एक लाख मिळवा. तटकरेंची इच्छा नाही पण पक्षाकडून दबाव, आदितींना लोकसभेची संधी की भाजपकडून धैर्यशील रिंगणात?
शेवाळे गावातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत शौचालय बांधून देण्यासंदर्भात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील केला आहे. गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती की, ज्या कोणी लोकांनी लाभार्थ्यांचे पैसे वाटले असतील त्यांच्यावर तरी गुन्हे दाखल करून शासनाचा लाटलेला पैसा रिकव्हर करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. यानंतर विस्तार अधिकारी कपिल वाघ यांनी आज ग्रामपंचायत शेवाळे येथे भेट देऊन आपण येत्या १ मार्च रोजी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पथक तयार करणार आहोत. तसेच प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन कुठल्या लाभार्थ्याला शौचालय मंजूर झाले आहे व त्याला त्याचा लाभ मिळाला नाही याची चौकशी करून या प्रकरणी दोषी आढळतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed