• Sat. Sep 21st, 2024

मुलाचा शाळेच्या आवारात अभ्यास, नितेश राणेंच्या मतदारसंघातच विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात?

मुलाचा शाळेच्या आवारात अभ्यास, नितेश राणेंच्या मतदारसंघातच विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात?

सिंधुदुर्ग: ग्रामीण किंवा शहरी भागांतील विद्यार्थी शिक्षणापासून कोणताही वंचित राहता नये, यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. शेवटच्या घटकापर्यंत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, असं धोरण राज्य सरकार दरवर्षी आखत असतं. पहिली ते दहावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचं सरकारचं धोरण आहे. मात्र शिक्षण मंत्र्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा पाहायला मिळतो आहे.देवगड तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील आरे या गावातील गणपतीवाडी या जिल्हा परिषद शाळेमध्ये चार विद्यार्थी शिकत होते. परंतु पटसंख्या अभावी पहिली ते चौथीपर्यंत असलेली जिल्हा परिषद शाळा प्रशासनाने अचानकपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. चार विद्यार्थी काही महिने शिक्षणापासून वंचित राहिले. त्या चार विद्यार्थ्यांपैकी तीन मुलांनी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्यायी शाळेचा मार्ग निवडला.
कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका, वाशिमच्या जवानाला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप
परंतु चिरंजीव सुनील खरात हा विद्यार्थी गेले दोन महिन्यांपासून स्वतः शाळेचे कुलूप उघडून शाळेमध्ये बसून अभ्यास करायचा. मात्र शिकवण्यासाठी दोन महिन्यांमध्ये एकही शिक्षक या शाळेमध्ये फिरकला देखील नाही. मात्र आता गेले चार ते पाच दिवसांपासून चिरंजीव खरात याच्याकडे शाळेची असलेली चावी शिक्षक घेऊन गेल्यामुळे चिरंजीव खरातला शाळेच्या आवारामध्ये बसूनच अभ्यास करावा लागत आहे. मात्र अभ्यास त्याला कोणतेही शिक्षक शिकवत नाहीत. त्यामुळे शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत घटकापर्यंत सरकारचे मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, असे राज्य सरकारचे धोरण आहे.

मात्र शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यात शिक्षणाचे तीन तेरा वाजलेले पाहायला मिळतात. चिरंजीव खरातच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पर्यायी शाळेमध्ये जाण्याचा मार्ग निवडला नाही. जर त्याला पर्यायी शाळेमध्ये जायचं असेल तर त्याच्या घरापासून जवळपास दोन ते तीन किलो किलोमीटर अंतरावर पर्यायी शाळा उपलब्ध आहे. त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेला चिरंजीव खरातचं भवितव्य कसं घडणार? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे.

अजित पवारांना थांबवलं, वडेट्टीवार आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरून आक्रमक

शिक्षण खातं शिक्षणाबाबतचे वेगवेगळे धोरण कायम राबवत असतात. मात्र चिरंजीव खरात या विद्यार्थ्यांसाठी वेगळे धोरण राबवणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. यावर कणकवली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी सांगितलं की, जर आमच्या विद्यार्थ्यांशी भविष्याबद्धल कोण खेळत असेल तर आम्ही सहन करणार नाही. या प्रकाराची संपूर्ण माहिती घेऊन आणि संबंधित शिक्षिकेवर कारवाई कशी करता येईल? याकडे लक्ष देईन. जेणेकरून विद्यार्थ्यांचा नुकसान होऊ नये. यासाठी आम्ही त्याची काळजी घेऊ, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed