• Mon. Nov 25th, 2024
    मनोज जरांगे पाटलांना झुकते माप देण्याचा प्रयत्न, आठवलेंनी सरकारला घेरलं

    लातूर: मराठा आरक्षणावर बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच नामांतराच्या लढ्याची आठवण करून सरकारला घरचा आहेर दिला.
    मुख्यमंत्री म्हणाले, करेक्ट कार्यक्रम करतो, काँग्रेसचा सवाल, जरांगेंचा जीव गेला तर शिंदेसाहेब तुम्ही जबाबदार का?
    रामदास आठवले म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांना झुकते माप देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. मराठ्यांना १०% आरक्षण दिलं. त्यामुळे मराठा आरक्षण विषय थंड व्हायला पाहिजे होता. आज मराठ्यांना जे आरक्षण देण्याचा निर्णय झाला त्याच बहुतांश श्रेय त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं. मराठ्यांना त्यांनी खडबाडून जागं केलं असल्याचेही ते म्हणाले आहेत. मात्र हे कुठे तरी थांबलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी नामांतराच्या लढ्याची आठवण करून दिली.ते पुढे म्हणाले की, आम्ही तर नामांतरसाठी १७ वर्षे थांबलो होतो. आमचे आंदोलन शांततेने चालू होते. मात्र आम्ही थोडंही उलट सुलट बोललो की आमच्यावर केसेस व्हायच्या, आम्हाला जेलमधे टाकलं जातं होतं. मात्र मनोज जरांगे पाटील हे अरेरावीची भाषा वापरत आहेत. ते गृहमंत्र्यांना आरेतुरेची भाषा करतात. आंदोलनाची आवश्यता नसताना देखील ते वारंवार सरकारला धमक्या देत आहेत. हे झालंच पाहिजे हे केलेच पाहिजे. सरकारने त्यांचे ऐकून एक दिवसाचं अधिवेशन ठेवलं.

    मनोज जरांगेंच्या आदेशावर मराठा समाज पुन्हा रस्त्यावर, धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

    मराठा समाजाला १०% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. ओबीसीमधून आरक्षण घेऊ असं ते म्हणत आहेत. त्यांना आरक्षण मिळालयं आता ते कसंही घेवू. पण त्यांनी काही काळ थांबलं पाहिजे. पण तस न थांबता अशी भुमिका घेताय. हे बरोबर नाही. कायदा सर्वांना सारखा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी बोलावं, असा सुचक इशाराही त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *