• Sat. Sep 21st, 2024

जालना जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जाफराबादमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, वीज कोसळून दोघांचा अंत

जालना जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जाफराबादमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, वीज कोसळून दोघांचा अंत

अक्षय शिंदे, जालना: जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांत सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने ज्वारी, मिरची, शेडनेट भाजीपाल्याचे चांगलेच नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हवामान खात्याने गारपीट व अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार सोमवारी सायंकाळी पावसाला सुरूवात झाली. काही वेळताच प्रचंड गारपीट झाल्याने जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये धांदल उडाली. यात अकोलादेव, टेंभूर्णी, भारज, काळेगाव, नांदखेडा अनेक गावांना गारपिटीचा तडाखा बसला. काही गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होता. कुंभारी येथील पल्लवी विशाल दाभाडे (वय १९) या महिला शेतकऱ्यासह सिपोरा बाजार येथील शिवाजी गणपत कड ( वय ३८) या दोघांचा वीज अंगावर कोसळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.गारपीट व पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारीचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. ज्वारीची कणसे काळे पडून उत्पादनावर परिणाम होणार आहे. शेडनेटचेही अनेक गावांत नुकसान झाल्याने भाजीपाला उत्पादक धास्तावले आहेत. गहू, हरभरा पिकांनाही चांगला फटका बसला आहे. जालना, बदनापूर, भोकरदन, अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर आदी तालुक्यातील काही गावांमध्ये पाऊस झाला.

लोकसभेच्या मैदानात साखर सम्राटांची कोंडी; नाराजी मतपेटीतून व्यक्त होणार? संभाव्य उमेदवारांच्या पोटात आला गोळा

फळबागांचेही मोठे नुकसान

जाफराबाद तालुक्यातील गारपिटीमुळे आंबा, मोसंबीसह इतर फळबागांना चांगलाच फटका बसला आहे. मोहरलेल्या आंब्याचे नुकसान झाले असुन मोहर गळून पडला आहे. तर मोसंबीला गारांचा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात मोसंबीला गळती लागली.

शेतात गारांचा ढीग

जाफराबाद तालुक्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला या पावसामुळे शेतकऱ्यांचे गहू , हरभरा, शाळु , आंबा, मोसंबी फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दरम्यान या गारांचा ढीग साचल्याचे काही व्हिडिओ देखील समोर येत आहे त्यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed