• Mon. Nov 25th, 2024

    राज ठाकरेंची एक मागणी मान्य होताच सुपुत्राचीही नवी विनंती, अमित ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना पत्र

    राज ठाकरेंची एक मागणी मान्य होताच सुपुत्राचीही नवी विनंती, अमित ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना पत्र

    मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयात “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे आपलं ‘राज्य गीत’ लावण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात यावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केली. अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. मनसेचा समावेश शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी यांच्या महायुतीत होण्यासंदर्भात चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंनी सरकारकडे नवी विनंती केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

    याआधी, शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी जुंपू नका, निवडणूक आयोगाने त्यांच्या कामासाठी पर्यायी यंत्रणा उभारावी, शिक्षक त्या कामांवर गेले नाहीत, म्हणून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली, तर त्याकडे आम्ही बघून घेऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिक्षकांना मोठा दिलासा दिला होता. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बीलएओ ड्युटीतून वगळून इतर कर्मचाऱ्यांना बीएलओ ड्युटी देण्याबाबतचे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले होते. त्यानंतर आता अमित ठाकरे यांनीही पत्र लिहित नवी मागणी केली आहे.

    अमित ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात काय?

    प्रति,
    श्री. एकनाथ शिंदे साहेब,
    मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
    यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

    जे गीत ऐकताच महाराष्ट्रातील मराठी जनतेचा ऊर अभिमानाने भरून येतो, ज्या गाण्याने प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात अशा “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…” ह्या कै. गीतकार राजा बढे लिखित आणि कै. शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायलेल्या गीताला गेल्या वर्षी दि. १ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राचे ‘राज्य गीत’ असा दर्जा देण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक अधिकृत शासकीय कार्यक्रमात ह्या राज्य गीताचे गायन करणे किंवा ध्वनिमुद्रित स्वरूपात ते लावणे अपेक्षित आहे आणि ते गायले जावेच- लावले जावेच हा आमचा आग्रह आहे.
    खालच्या पातळीवरील टीकेला संयमाने उत्तर द्या, उगाच त्यांना सहानुभूती नको; अजितदादांनी कान टोचले
    शासकीय परिपत्रकानुसार, राज्यातील प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात अध्ययन वर्ग सुरू होण्यापूर्वी “जन गण मन अधिनायक जय हे…” ह्या आपल्या राष्ट्रगीताचे गायन करणे अनिवार्य आहे. राष्ट्रगीताचा मान राखण्याबाबत शालेय स्तरापासून ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक संस्कार केले जातात, त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या राज्य गीताचे महत्व भावी पिढ्यांना- विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी आणि त्यांना आपल्या अत्यंत प्रेरणादायी राज्य गीताचा उचित सन्मान राखण्याची सवय लावण्यासाठी प्रत्येक शाळा तसंच महाविद्यालयात राज्य गीताचे गायन अनिवार्य करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयांत प्रवेश करताच विद्यार्थी सहज वाचतील अशा ठिकाणी म्हणजे शैक्षणिक संस्थेच्या इमारतीच्या दर्शनी भागात एका मोठ्या फलकावर अथवा भिंतीवर ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…’ हे संपूर्ण राज्य गीत लिहून त्याला कायमस्वरुपी ठळक प्रसिद्धी देण्याचे आदेश आपण सर्व शैक्षणिक संस्थांना द्यावेत. त्याच प्रमाणे, बांद्यापासून चांद्यापर्यंतच्या प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या दर्शनी भागातही आपले राज्य गीत लावण्यात यावे.
    धैर्यशील माने, थांबता का बघा; सदाभाऊ खोत यांचं जाहीर आवाहन; बावनकुळे म्हणाले, फडणवीसांचाही तुम्हालाच पाठिंबा
    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या या मागण्यांचा आपण गांभीर्याने विचार करावा, ही विनंती. उद्या २७ फेब्रुवारी. ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या पूर्वसंध्येला आपण याबाबतचा शासकीय आदेश काढला तर सर्वांना निश्चितच आनंद होईल.

    राज ठाकरेंनी शरद पवारांना डिवचलं; सुप्रिया सुळेंनी हसत-हसतच निकाल लावला

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
    धन्यवाद.
    आपला नम्र,
    अमित ठाकरे
    अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed