• Sat. Sep 21st, 2024
भाजप आणि शिवसेना एकत्र असताना ठाकरेंकडून मला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर : रामदास आठवले

सोलापूर: केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आरपीआयची भूमिका स्पष्ट केली आहे. रामदास आठवले यांनी रविवारी दुपारी बारा वाजता सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत माहिती देत सोलापूर लोकसभा मतदारसंघात आरपीआय तर्फे राजा सरवदे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी असणार, अशी माहिती दिली आहे.आरपीआयच्या उमेदवाराला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास सोलापुरातील दलित मतांच विभागणीकरणं होणार आहे हे मात्र नक्की. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना प्रकाश आंबेडकर यांनी तगडी फाईट देत भाजपच्या उमेदवाराला अप्रत्यक्षपणे फायदा करून दिला होता. रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा मतदारसंघात आरपीआयच्या उमेदवाराला उभं केल्यास काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंना जबरदस्त फटका बसणार आहे, असा अंदाज राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.
मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांची जात काढली, आनंद दवे संतापले, म्हणाले ते दिवसेंदिवस विकृत होत चाललेत…
रामदास आठवले यांनी सांगितले की, शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात आरपीआय आठवले पक्ष स्वतःच्या चिन्हावर लढणार आहे. कमळाच्या चिन्हावर लढण्याचं प्रश्नच उद्भवत नाही. रामदास आठवले हे तीन वेळा खासदार आहेत. पंढरपूर मतदारसंघातून अपक्ष लढवले होते. त्यानंतर दोन वेळा खासदार झाले. तिन्ही वेळा स्वतंत्र लढलो, तर याही वेळेस स्वतंत्र लढणार असे रामदास आठवले यांनी चिन्हाबाबत स्पष्ट केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आरपीआय आठवले गटाचा उमेदवाराने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर काँग्रेस, भाजप आणि आरपीआय आठवले गट अशी लढत होईल.

दरम्यान रामदास आठवले यांनी आपल्या शेरोशायरी अंदाजातून तुतारीवर टीका केली आहे. “शरद पवारांना मिळाली आहे तुतारी… बघू या गावा गावात किती ऐकणार म्हातारी!”. रामदास आठवले यांनी शायराना अंदाजात तुतारीवर टीका करताच हास्यकल्लोळ निर्माण झाला होता. शरद पवार एनडीएसोबत आले असते तर त्यांचा पक्ष फुटला नसता. उद्धव ठाकरे देखील भाजपसोबत गेले असते तर त्यांचा पक्ष फुटला नसता, असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

बारामती लोकसभेत नणंद-भावजय लढत; सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, मतदारसंघात दौरे वाढले

उद्धव ठाकरेंवर बोलताना रामदास आठवले यांनी गौप्यस्फोट केला आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र असताना उद्धव ठाकरेंनी मला उपमुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली होती. तसेच केंद्रातील अनंत गीते यांचा अवजड उद्योग मंत्रालय देण्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. पण मी स्पष्टपणे नकार दिला होता, अशी माहिती रामदास आठवले यांनी सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायलाच नको होतं. त्यांच्यामुळेच पक्ष फुटला, असाही आरोप केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed