• Mon. Nov 25th, 2024

    शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी, पावसाबाबत हवामान खात्याचा अलर्ट, जाणून घ्या वेदर अपडेट

    शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी, पावसाबाबत हवामान खात्याचा अलर्ट, जाणून घ्या वेदर अपडेट

    बुलढाणा: प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर द्वारे प्राप्त हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात २५ फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २६,२७ फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची व गारपिटीची शक्यता आहे.

    शेतकरी बंधूंनी कापणी, मळणी केलेला शेतमाल व तोडणी केलेली फळे, भाजीपाला सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा जेणेकरून संभाव्य पावसाने, गारपीटीमुळे संबंधित शेतमाल खराब होणार नाही. खराब हवामान परिस्थिती असताना जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत. असे जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा डॉ. प. दे. कृ. वि. अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सूचना देण्यात आले आहे.

    एकीकडे आता या दिवसांमध्ये कोरडे वातावरण व शेतीच्या इतर कामगिरीकडे व रब्बीतील काही पिके असताना ते अत्यंत बाजारात घेऊन जाण्याची लगबग आनंदाने करत असतो त्यांच्या चिंतेमध्ये भर घालणार आहे. सध्या तापमानाचा दुपारी बारानंतर ३४ डिग्री जातो च पुन्हा एकदा सकाळच्या वेळेस १० ते 14 डिग्री सेल्सियस पर्यंत उतरतो .यामुळे बळीराजाचा चिंतेत आहेत. पण सर्वसामान्य नागरिक देखील हैराण आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed