• Sat. Sep 21st, 2024

दिल्लीच्या उंबरठ्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे सरकार ढुंकूनही पाहत नाही : शरद पवार

दिल्लीच्या उंबरठ्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे सरकार ढुंकूनही पाहत नाही : शरद पवार

पुणे: मागील ७० वर्षात देशाने अनेक सत्ताधारी पाहिले. कॉंग्रेस, समाजवादी आणि भारतीय जनता पक्षाचेही सरकार पाहिले. पण कधी लोकशाहीची चिंता वाटली नाही. पण गेली आठ दहा वर्ष सत्तेचा गैरवापराची अनेक उदाहरणे सत्ताधाऱ्यांनी देशासमोर ठेवली आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी केंद्र सरकारवर केली. विकासाची गॅरंटी देणाऱ्यांच्या धनादेशावर तारीख नाही आणि तो धनादेश वटतही नाही, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

महाविकास आघाडी पहिला जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पुण्यात कॉंग्रेस भवनाच्या प्रांगणात पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी ते बोलत होते.
“भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा”, शरद पवारांकडून मोदींवर सडकून टीका
देश घडविणाऱ्या, दिशा देणाऱ्या, संसदीय लोकशाही टिकवून ठेवणाऱ्या देशभरातील नेत्यांबद्दल घृणा पसरविण्याचा केंद्र सरकारचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. दुसरीकडे केंद्राकडून विरोधी विचारांवर घाव घालण्याचे‌ काम सुरू आहे. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना खोट्या आरोपांखाली तुरुंगात डांबले जात आहे. हे बदलण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी आपण सामान्य जनतेला भविष्यातील संकटाची माहिती द्यावी, असे पवार म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News

नेहरू, इंदिरा गांधी, वाजपेयी यांसारख्या पंतप्रधानांनी देश एकसंघ ठेवत राज्य व केंद्रात समन्वय ठेवला. मोदींची राज्यांबाबतची भूमिका मात्र, असहकार्याची आहे. त्यामुळे अनेक राज्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसने बँकेत, जलसिंचनात भ्रष्टाचार केला, असा आरोप मोदी यांनी भाषणातून केला आहे. देशातील तपासयंत्रणांनी तपास करून मोदींनी त्याचा अहवाल देशासमोर ठेवावा, असे आव्हानही पवार यांनी या वेळी दिले.
अशोक चव्हाणांचं पक्षांतर ते चंदीगड महापौरपदाची निवडणूक, शरद पवारांचं भाजपच्या ‘त्या’ रणनीतीवर बोट

शेतकरी मोदींना सत्तेतून उपसतील

सध्याचे राज्यकर्ते सामान्यांच्या हिताचे रक्षण करणारे आहेत, असे मला वाटत नाही. प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता दिल्लीच्या उंबरठ्यावर येऊन आंदोलन करणाऱ्या, देशाचे अन्नदाते असलेल्या शेतकऱ्यांकडे सरकार ढुंकूनही पाहत नाही. मात्र, हेच शेतकरी ज्या प्रकारे शेतातील तण उपसून फेकतात, तसेच ते मोदी सरकारलाही सत्तेतून उपसून टाकतील, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed