• Sat. Sep 21st, 2024
धक्कादायक! भरदिवसा फोटोग्राफरला संपवलं, आरोपी सीसीटीव्हीत कैद, नागपुरात खळबळ

नागपूर: शहरातील सदर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राजनगर परिसरात भरदिवसा एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राज नगर झोपडपट्टीसमोर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विनय पुणेकर असं मृतकाचे नाव आहे. आरोपी घरातून पळून जाताना मृतकाच्या घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या आरोपी कोण आहे हे समजू शकलेले नाही. मृतक हा फ्रीलान्स फोटोग्राफर म्हणून काम करत होता. आरोपींनी सायलेन्सर लावलेल्या बंदुकीतून गोळीबार करून विनय पुणेकर याची हत्या केल्याची माहिती आहे. घटनेच्या वेळी विनय घरात एकटाच होता.नागपूर शहरात गेल्या २४ दिवसांत हत्येची ही १३वी घटना आहे. सदर पोलीस ठाण्याच्या राजनगर परिसरात भरदिवसा घरात शिरून विनय उर्फ बबलू पुणेकर या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये भिती पसरली. भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे.
रत्नागिरी हादरलं! पुतण्याकडून काकूचा घात, मारहाणीनंतर वृद्धेला निर्दयीपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर
नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, विनय पुणेकर यांचा २००६ मध्ये पत्नीपासून घटस्फोट झाला. तेव्हापासून ते राजनगर येथील फ्लॅटमध्ये वेगळे राहत होते. घटस्फोटानंतर त्यांच्या पत्नी प्रा. कॅरेल आणि मुलगा प्रेज हे विजयनगरमध्ये राहायला गेले. शनिवारी दुपारी १२.४२ वाजताच्या सुमारास एक मास्क घातलेला युवक त्यांच्या घरी आला. विनय यांनी त्याला पाणी प्यायला दिले. त्यानंतर युवकाने त्यांच्या दिशेने पिस्तूल रोखली. विनय यांनी प्रतिकार केला. सायलेन्सर लागलेल्या पिस्तूलातून गळ्यावर गोळी झाडून विनय यांची हत्या केल्यानंतर युवक पसार झाला.

काही वेळाने शेजारी राहणारी मुलगी त्यांच्याकडे आली. तिने आवाज दिला. प्रतिसाद मिळाला नाही. तिने धक्का दिला असता दरवाजा उघडला. विनय हे खाली पडलेले दिसले. तिने शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजाऱ्यांनी धाव घेतली. एकाने प्रेजला कळविले. प्रेज तेथे आला. विनय यांच्या गळ्याला गोळी लागलेली दिसली. एका नागरिकाने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस सहआयुक्त अस्वती दोरजे, अपर पोलिस आयुक्त प्रमोद शेवाळे,उपायुक्त राहुल मदने यांच्यासह सदर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पचंनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला.

आव्हाडांनी चॅलेंज स्विकारलं, तुतारी वाजवली, मिटकरींकडून बक्षिस तयार

ही घटना घडल्यानंतर परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी कैद झाला असून त्याआधारे त्याचा शोध सुरू आहे. काही काळापूर्वी विनय एका वृत्तपत्रात फ्रीलान्स फोटोग्राफर म्हणून काम करत होता. सध्या तो स्वत:चा फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता. नागपूर शहरात दररोज खुनाच्या घटना घडल्यानंतर आता पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed