• Sat. Sep 21st, 2024

आव्हाड, तुतारी वाजवून दाखवा अन् १ लाख घेऊन जा! मिटकरींचं चॅलेंज; पण चेक लिहिताना गंडले

आव्हाड, तुतारी वाजवून दाखवा अन् १ लाख घेऊन जा! मिटकरींचं चॅलेंज; पण चेक लिहिताना गंडले

अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या निवडणूक चिन्हाचा अनावरण सोहळा रायगडावर संपन्न झाला. या सोहळ्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, सुमन पाटील, राजेश टोपे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी तुतारी वाजवली. यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी आव्हाडांना थेट आव्हान दिलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी तुतारी वाजवून दाखवावी. पण आवाज तुतारीतूनच आला पाहिजे. आव्हाडांनी तुतारी वाजवल्यास मी त्यांना १ लाख रुपये देईन, असं आव्हान मिटकरींनी दिलं. आव्हाडांचा रायगडावरील व्हिडीओ दाखवत तुतारी मिटकरींनी त्यांना आव्हान दिलं. आजचा व्हिडीओ मी पाहिला. त्यात आव्हाड तुतारी वाजवताना दिसत आहेत. पण प्रत्यक्षात तसं नाही. व्हिडीओ नीट बघा. तुतारी वाजवत असताना आव्हाडांचं पोट पुढे आलेलं आहे आणि मागचे वादक तुतारी वाजवत आहेत, असा दावा त्यांनी केला.
तीन तिगाडा काम बिगाडा? मविआमध्ये तिढा, जागावाटप मार्गी लागेना; नेमका फॉर्म्युला ठरेना
जितेंद्र आव्हाड आव्हान स्वीकारत असतील तर मीही तयार आहे, असं मिटकरी म्हणाले. २६ तारखेपासून मुंबईत विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आव्हाडांनी तुतारी आणावी आणि पत्रकारांसमोर ती एकट्यानं वाजवून दाखवावी. त्यांनी आव्हान पूर्ण केल्यास त्यांना मी १ लाख रुपये देईन. त्यांच्या नावाचा धनादेश माझ्याकडे तयार आहे, असं म्हणत मिटकरींनी १ लाख रुपयांचा धनादेश माध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवला.
मित्राच्या जागी परीक्षेला बसला; ४ पेपर दिले, पाचव्यावेळी फसला; ‘सही रे सही’मुळे अडकला
चेक लिहिताना मिटकरी चुकले
अमोल मिटकरींनी दाखवलेल्या धनादेशात एक महत्त्वाची चूक आहे. धनादेशात पेई अर्थात ज्याच्या नावे धनादेश काढला जातो, तिथे मिटकरींनी रक्कम लिहिली आहे. तर जिथे रक्कम लिहायची, तिथे जितेंद्र आव्हाडांचं नाव लिहिलं आहे. आव्हाड यांना आव्हान देताना, त्यांच्या नावाचा धनादेश लिहिताना मिटकरी चूक करुन बसल्याचं दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed