• Mon. Nov 25th, 2024
    नाराज शिवसैनिकांच्या घोषणा अन् मनोहर जोशींना दसरा मेळाव्यात स्टेजवरुन खाली उतरावं लागलेलं!

    मुंबई : माजी लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचं आज पहाटेच्या सुमारास निधन झालं. दोन दिवसांपूर्वी हार्ट अटॅक आल्यानंतर जोशींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हिंदुजा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या निमित्ताने मनोहर जोशींच्या राजकीय कारकिर्दीला उजाळा दिला जात आहे.

    मनोहर जोशी यांनी नगरसेवक, महापौर, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यसभा सदस्य आणि लोकसभा अध्यक्ष अशी संसदीय राजकारणातील जवळपास सर्वच प्रमुख पदं भूषवली होती. त्यांची राजकीय कारकीर्द बहुआयामी राहिली आहे.
    मतांपेक्षा जास्त उमेदवार, तीन राज्यात भाजपची खेळी, राज्यसभेच्या १५ जागांसाठी निवडणुका अटळ
    १९९५ मध्ये शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशींवर विश्वास दाखवत त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली होती. महाराष्ट्राचे पहिले गैर-काँग्रेसी मुख्यमंत्री होण्याचा मान मनोहर जोशींना मिळाला होता. जोशींनी चार वर्ष मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. गेल्या काही काळापासून मात्र ते राजकारणापासून अलिप्त राहिले होते.
    फक्त बारा जागा कशा? भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, शिंदेंचे खासदार गजानन कीर्तिकर नाराज
    १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात २०१३ मध्ये झालेल्या पहिल्याच दसरा मेळाव्यात मनोहर जोशींना शिवसैनिकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं होतं. भर दसरा मेळाव्यातून त्यांना परत जावं लागलं होतं.

    Former Maharashtra CM Manohar Joshi Death : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन

    बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा वाद होता. त्या अनुषंगाने मनोहर जोशी यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मनोहर जोशी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत जोशींचा लेखी माफीनामा देण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु तसं न करताच मनोहर जोशी मातोश्रीबाहेर पडले. इतकंच नाही, तर माध्यमांशी बोलताना त्यांनी सारं काही आलबेल असल्याचंही सांगितलं होतं.
    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    नेमकं काय घडलं होतं?

    दसरा मेळाव्याच्या दिवशी मनोहर जोशींना पुन्हा माफीनाम्याची आठवण करुन देण्यात आली. परंतु त्यांनी माफीनामा दिला नाही. त्यामुळे व्यासपीठावर आला नाहीत, तरी चालेल, असा निरोप त्यांना मातोश्रीवरुन पाठवण्यात आल्याचं बोललं जातं. मात्र आपण गेलो नाही, तर दोषी आहोत, असं वाटेल, या भावनेने ते दसरा मेळाव्याला गेले. उद्धव ठाकरे व्यासपीठावर पोहोचले, तरी जोशी आले नव्हते. मात्र इतक्यात जोशी आले आणि व्यासपीठावर जाऊ लागले. परंतु राहुल शेवाळे, मिलिंद नार्वेकर यांनी जोशींना अडवण्याचा प्रयत्न केला. तरीही ते हट्टाने जाऊन बसले. त्यानंतर शिवसैनिक मनोहर जोशी सरांच्या विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. त्यामुळे दसरा मेळावा सुरु असतानाच मंचावरुन उतरुन निघून जाण्याची वेळ मनोहर जोशींवर आली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed