• Mon. Nov 25th, 2024

    माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. दोन दिवसांपूर्वी जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयात जोशी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र आज पहाटे मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला

    कोण होते मनोहर जोशी

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडूण येत त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली होती. शिवसेनेकडून जोशी यांनी मुंबईचे महापौरपदही भूषविले होते. १९९५मध्ये शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली होती.

    माझा पक्षात टिश्यू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद म्हणत शिल्पा बोडखेंचा ठाकरे गटाला रामराम

    मागील काही काळापासून प्रकृतीच्या कारणास्तव मनोहर जोशी सक्रीय राजकारणापासून दूर होते. जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष जोशी सरांवर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. मागील वर्षी मनोहर जोशी यांनी मोठ्या आजारावर जिद्दीने मात केली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed