• Sat. Sep 21st, 2024
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका, हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांना बुधवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यवस्त आहे. सध्या ते आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली असून त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळत आहेत.
निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, शरद पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते मनोहर जोशी यांना बुधवारी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांची प्रकृती अत्यवस्त आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांना उत्तम वैद्यकीय उपचार देण्यात येत असल्याची माहिती पी. डी. हिंदुजा रुग्णालयाने दिली.

आता मराठा समाज पेटलाय, पागल समजता का लोकांना?, आज नाही झालं तर पुढचा कार्यक्रम करेक्ट करणार : मनोज जरांगे

दरम्यान मुख्यमंत्री मनोहर जोशी काही काळापासून राजकारणात सक्रिय नाहीत. मनोहर जोशी यांची राजकीय कारकीर्द बरीच मोठी आहे. मुख्यमंत्री व्यतिरिक्त ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, आमदार, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य राहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed