• Sat. Sep 21st, 2024
कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, सुभेदार अजित मोरे शहीद; खेड तालुक्यावर शोककळा

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आस्तान गावचे सुपुत्र सुभेदार अजित अशोकराव मोरे हे आपली देश सेवा बजावताना शहीद झाले आहेत. लेह-लडाख येथे आपली देश सेवा बजावत असताना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. निधनासमयी त्यांचे वय ४२ वर्षे होते. खेड तालुक्यातील आस्तान, तिसंगी हा हा गाव परिसर सैनिकी परंपरा लाभलेला मोठा परिसर आहे. या गाव परिसरात अनेक कुटुंबातील युवक हे सैन्यात दाखल आहेत. सुभेदार अजित मोरे यांचे वडील हे निवृत्त सैनिक आहेत.सुभेदार अजित अशोकराव मोरे, गाव आस्तान ता. खेड जिल्हा. रत्नागिरी यांचे लेह- लडाख येथे आपली देश सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. २२ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या वेळी मोरे यांचं १.३० (दीड) वाजता दुःखद निधन झालं आहे. आपली सैन्य सेवा बजावताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांचे पार्थिव लेह लडाखवरुन पुण्यात आणण्यात येणार असून त्यांचे अंतिम विधी पुणे येथे राहत्या घरी होणार आहेत. भैरव नगर, सर्वे नं. ५२ गल्ली नं. ०३ काशिनाथ नगर पुणे, धाणोरी रोड पुणे १५ या त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी त्यांचे पार्थिव आणले जाणार आहे.
शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात जागा वाटपासंदर्भात चर्चा, किती जागा जिंकू शकतो ते ही सांगितलं!
सुभेदार मोरे यांच्या राहत्या घरातून भैरव नगर रोड नंबर ३, दत्त मंदिराजवळ येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. अमरधाम स्मशानभूमी येरवडा येथे दिनांक २३ फेब्रुवारी रोजी म्हणजे उद्या सकाळी १०.०० (दहा) वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात अशोक यशवंतराव मोरे (वडील), अमोल अशोकराव मोरे (भाऊ), रामचंद्रराव चांदजीराव मोरे (अजोबा) असा मोठा परिवार आहे. ही दुर्दैवी घटना कळताच खेड तालुक्यावरही मोठी शोककळा पसरली आहे.

सुभेदार अजित मोरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. मुलगी इयत्ता पाचवीमध्ये असून मुलगा इयत्ता सातवीत आहे. एक भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे. हे कुटुंब गेले अनेक वर्ष पुण्यामध्ये स्थायिक आहे. आई-वडील येऊन जाऊन गावी असतात. सुभेदार अजित मोरे यांचे सगळे शिक्षण हे पुण्यामध्ये झालं आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed