• Sat. Sep 21st, 2024

मुंबई शहर जिल्ह्यात २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सव – जिल्हाधिकारी संजय यादव

ByMH LIVE NEWS

Feb 21, 2024
मुंबई शहर जिल्ह्यात २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सव – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबईकरांना पाच दिवस मिळणार सांस्कृतिक मेजवानी

मुंबई दि. 21 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्यावतीने महासंस्कृती महोत्सव 2024चे आयोजन काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदान येथे 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले  आहे. गुरुवारदिनांक 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सलग पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार असून सर्वांनी या महोत्सवातील कार्यक्रमांचा आनंद घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल  आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

महोत्सवात विविध प्रदर्शन दालनेरंगमंचावरील सांस्कृतीक कार्यक्रम व मर्दानी खेळ असणार आहेत.  प्रदर्शन दालनात शिवकालीन शस्त्रेनाणी व हस्तलिखितेशिवसंस्कार काव्य दालनस्वराज्य ते साम्राज्य या आर्ट गॅलरीचा समावेश करण्यात आला आहे.

महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात नृत्यवंदना कार्यक्रम होणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी 7 वाजता जल्लोष या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता लेझीम व मर्दानी खेळतर सायंकाळी 7.00 वाजता मराठी लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.00 वाजता मल्लखांबसायं. 5.00 वाजता शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सवसायंकाळी 7 वाजता सप्तरंग या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दशावतार या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी 7.00 वाजता शिववंदना हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.00 वाजता पारंपरिक नृत्य व मर्दानी खेळ तर सायंकाळी 7.00 वाजता मराठी बाणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

000

 

दीपक चव्हाण/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed