• Mon. Nov 25th, 2024
    उमेदवारांना दारात येऊ देऊ नका-गाड्या ताब्यात घ्या, निवडणूक काळात जरांगेंच्या आंदोलनाचा पॅटर्न

    जालना : मराठा समाजाची मागणी इतर मागास वर्गातूनच (ओबीसी) आरक्षण मिळण्याची आहे. आमची फसवणूक झाली आहे, असे सांगत मनोज जरांगे यांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. येत्या २४ तारखेपासून मराठा बांधवांनी प्रत्येक गावागावात आंदोलन करावं. आपल्याला सरकारला जेरीस आणण्यासाठी आंदोलन करायचं आहे. त्यामुळे २४ तारखेपासून दरदिवशी साडे दहा वाजता प्रत्येक गावात एकाचवेळी रास्ता रोको करा. आता नेतेमंडळींचा आणि आपला संबंध नाही. त्यांना आपल्या दारात येऊ द्यायचं नाही, अशी आंदोलनाची दिशा मनोज जरांगे यांनी उपस्थित समाजबांधवांना सांगितली. त्याचवेळी आमच्या मुलांना जर त्रास झाला तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. आता गावागावील वृद्धांनी उपोषणाला बसावं, त्यांच्या जीवाचं बरंवाईट झालं तर सरकार त्याला जबाबदार असेल, असे सांगताना आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत असा इशारा त्यांनी दिला.मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर होताच मंगळवारी दुपारी मनोज पाटील जरांगे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करून, औषधोपचार, पाणी घेणे बंद केले, तसेच सलाईन तातडीने काढून टाकले. आज बुधवारी समाजबांधवांची बैठक बोलावून त्यांनी येथून पुढच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
    सगेसोयऱ्यांबाबत निर्णय नाहीच, मनोज जरांगे पाटील संतापले, उपचार घेणे सोडले, चालू प्रेसमध्ये सलाइन काढलं!

    मनोज जरांगे म्हणाले, येत्या २४ तारखेपासून गावा गावात रास्ता रोको आंदोलन करा. आंदोलनं सरकारला जेरीस आणण्यासाठी करायचं आहे. सगे सोयऱ्याची अंबलबजावणीसाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. दररोज सकाळी १०.३० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत आपापल्या गावात आंदोलन करायचं. पोलिसांना आंदोलनाची परवानगी मागा, परवानगी दिली तर उत्तम पण जरी परवानगी नाकारली तरी तुम्ही आंदोलन करा. ज्याला सकाळी जमलं नाही त्याने सायंकाळी ४ ते ७ पर्यंत दररोज आंदोलन करायचं. परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अडचण येता कामा नये. शांततेत आंदोलन करावं. कोणाची गाडी फोडायची नाही, जाळायची नाही पण ती गाडी पुढं जाऊ द्यायची नाही. आम्हाला पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं.
    मनोज जरांगेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा, सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी अल्टीमेटम

    आमदार खासदार मंत्र्यांनी आमच्या दारासमोर यायचं नाही. आमच्या बांधवांना नेत्यांनी घरासमोर बसू दिलं नाही. यांच्या दारात कोणी जायचं नाही, तुम्ही यांची किंमत वाढवली, त्यांना आमदार खासदार तुम्ही केलं. आता यांना आपल्या दारात येऊ द्यायचं, अशी सूचनाही त्यांनी समाजबांधवांना केली. निवडणूक काळातल्या नव्या आंदोलनाच्या पॅटर्नची घोषणा जरांगेनी केली.

    निवडणूक काळात आलेल्या उमेदवाऱ्याच्या गाड्या वापस जाऊ देऊ नका, त्याची जाळपोळ न करता त्या गाड्या ताब्यात घेऊन निवडणुका संपल्यावर परत करा. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका पुढे ढकलण्याचे यांना सांगितले पाहिजे, असंही जरांगे म्हणाले. सगेसोयरे तरतुदीची अंमलबजावणी होईपर्यंत एकही मराठा मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed