• Sat. Sep 21st, 2024
करोनात नोकरी गेली, PhD धारक प्राध्यापकाची भंगार व्यवसायात उडी, चार वर्षांतच लाखोंची कमाई

निलेश पाटील, जळगाव : करोना काळात अनेकांचे आयुष्याची वाताहत झाली. कोणी आप्त गमावले, तर कोणी अर्थार्जनाचं साधन. जळगाव शहरातील पीएचडीधारक शिक्षकाने करोना काळात नोकरी गमावली, मात्र भंगारातून त्याचं नशीब उजळलं.

जळगाव शहरातील नारायण अटकोरे हे पीएचडी नेट सेट झालेले प्राध्यापक. २००९ पासून एका महाविद्यालयात विनाअनुदानित तत्त्वावर त्यांनी नोकरी सुरू केली. महाविद्यालयाला अनुदान येईल, या आशेवर त्यांनी १२ वर्ष तीन हजार रुपये पगारावर काम सुरु केलं. मात्र तीन हजार रुपये पगारावरती घर चालणं शक्य नव्हतं.

अटकोरे यांनी क्लासेस सुरू केले तसेच संध्याकाळी जे काम मिळेल ते काम ते करू लागले. यातून महिन्याला दहा हजार रुपये ते कमवत होते. त्यातून मुलांचे शिक्षण व घर खर्च भागवत होते. २०१९ मध्ये करोना आला आणि संपूर्ण लॉकडाऊन झाले. यातच नारायण अटकोरे यांची नोकरीही गेली. घरात दोन लहान मुले असल्याने घर कसे चालवायचे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

कशी सुचली आयडिया?

विचार करत असताना त्यांच्या घरासमोरून एक भंगारवाला गेला. आणि त्यांच्या मनात विचार आला, आपणही भंगार व्यवसाय का करु शकत नाही? त्यांनी भंगारवाल्याला विचारले असता त्याने सांगितले, की या व्यवसायात काहीच परवडत नाही, तुम्ही या व्यवसायात पडू नका, मात्र त्यांच्या मनामध्ये जिद्द आणि चिकाटी होती. त्यामुळे त्यांनी भंगारचा व्यवसाय सुरू करायचे हा निश्चय केला

कोणताही व्यवसाय सुरू करताना आधी भांडवल लागते. प्राध्यापक नारायण अटकोरे यांच्याकडे भंगार व्यवसाय सुरू करण्यासाठी एक रुपयाही नव्हता. व्यवसाय तर सुरू करायचा, मात्र पैसे आणायचे कुठून? त्यांनी पत्नी प्रतिभा यांच्याशी चर्चा केली, मात्र पत्नीनेही हा व्यवसाय करण्यास नकार दिला. तुम्ही पीएचडी नेटसेट झालेले प्राध्यापक आहात आणि हा भंगारचा व्यवसाय कुठून करत आहात? समाज आपल्याला काय म्हणेल, या हेतूने पत्नीने नकार दिला मात्र नारायण अटकोरे यांची जिद्द होती.
इथून जयंतराव, तिथून तू; शिरसाटांची वैभव नाईकांना ऑफर; तुमचा शपथविधी कधी सांगा? नाईकांचे टोले

NDA ऑनलाइन कबाडीवाला

अखेर पत्नीने देखील हा व्यवसाय सुरू करायला होकार दिला. पत्नीचे दागिने मोडून त्यातून पन्नास हजार रुपये आले आणि मित्राकडून थोडेफार पैसे घेऊन अटकोरे यांनी हा व्यवसाय सुरू केला. आधी एका छोट्याशा भाड्याच्या दुकान पेपरवरती व्यवसाय सुरू केला. त्यानंतर हळूहळू सर्व भंगार जमा करायला लागले. लॉकडाऊन असल्याने सर्व शाळा महाविद्यालय हे ऑनलाइन सुरू होते. हे पाहून त्यांच्याही डोक्यात कल्पना सुचली, की भंगारचा व्यवसाय देखील ऑनलाइन होऊ शकतो. त्यांनी एक वेबसाईट तयार करून स्वतःचे नाव नारायण दाजीबा अटकोरे (NDA ऑनलाइन कबाडीवाला) दिले. हळूहळू त्यांनी आपल्या व्यवसायाची प्रसिद्धी केली आणि या व्यवसायाला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. आपला मराठी माणूस या व्यवसायात उतरला असल्याने नागरिकांमध्ये एक आनंद होता

भाड्याचं दुकान ते कंपनीची उभारणी

एक दहा बाय दहाच्या दुकानात सुरू केलेला व्यवसाय आज त्यांनी पाच हजार स्केअर फुट जागा भाड्याने घेऊन या ठिकाणी कंपनी उभारली आहे. कधीकाळी तीन हजार रुपये पगारावर विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारे नारायण अटकोरे आज स्वतःच्या व्यवसायात चार ते पाच कामगारांना महिन्याकाठी एक लाख रुपये पगार देत आहेत. हा व्यवसाय सुरू करून चार वर्ष होत आली आहेत. वर्षाकाठी ३० ते ३५ लाख रुपयांची उलाढाल प्राध्यापक नारायण अटकोरे करीत आहेत. हळूहळू या व्यवसायातून प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. लवकरच ते हा व्यवसाय आणखी मोठा करण्याचा मानस त्यांनी केला आहे.
एक मराठा लाख मराठा, काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचं लक्षवेधी जॅकेट, विधिमंडळात चर्चेचा विषय
व्यवसाय सुरू करताना त्यांच्या मनामध्ये एक विचार होता, की आपण समाजाचे काही देणे लागतो. या हेतूने त्यांनी दरवर्षी गोरगरीब लोकांना कपडे वाटप तसेच ज्या मुलींना आई-वडील नाही अशा मुलींच्या लग्नाला जमेल तेवढी मदत नारायण अटकोरे करीत असतात. यातून त्यांना समाधान देखील मिळते. नारायण अटकोरे यांनी स्वतः पीएचडी नेटसेट असून आठ पुस्तक स्वतः लिखित आहेत, मात्र त्यांनी शिक्षणाचा मोठेपणा न दाखवता एक समाजापुढे वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. तरुणांनी देखील शिक्षण मोठे असले तरी व्यवसायाकडे वळावे कुठलाही व्यवसाय छोटा नाही, मनात जिद्द चिकाटी असेल तर शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ही मनुष्यामध्ये असते असे देखील त्यांनी तरुणांना सांगितले आहे.

शक्यतो झाडं लावा, नाहीतर तोडा; ही कायद्यातील भंगार ओळ : सयाजी शिंदे

सायकल ते तीन गाड्या

सायकल वरती सुरू झालेला प्रवास आज त्यांच्याकडे स्वतःच्या तीन गाड्या आहेत. एक नवीन चारचाकी वाहन त्यांनी खरेदी केले आहे. लवकरच या व्यवसायातील ते प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार आहे आणि NDA कबाडीवाला हे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही असा त्यांचा निश्चय आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

व्यवसाय सुरू करताना जी खंबीर साथ असते ती पत्नीची. करोना काळात पतीची नोकरी गेली आणि सर्व चिंतेत सापडले. घर कसे चालवायचे, दोन मुलींचा शिक्षणाचा खर्च कसा करायचा, हा प्रश्न होता. भंगार व्यवसाय सुरू करायचा, हे त्यांनी मला विचारले. आधी सुरुवातीला हा भंगार व्यवसाय सुरू करायचा नाही, असे मी त्यांना सांगितले मात्र त्यांची जिद्द असल्याने थोडा विचार करून मी त्यांना होकार दिला. व्यवसायाला भांडवल नव्हते. माझे स्वतःचे दागिने मोडून हा व्यवसाय सुरू केला. लोकं आधी आम्हाला हसायचे आता तेच लोक आमचे कौतुक करत आहेत एक आनंद देखील मनात आहे आज आम्ही चार ते पाच मजुरांना रोजगार देऊ शकलो यापेक्षा मोठा आनंद कोणता नाही, असे त्यांच्या पत्नीने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed