• Sat. Sep 21st, 2024
आशिष शेलार शिवतीर्थावर, मनसे-भाजप महायुतीच्या चर्चांना हवा; राज ठाकरेंना दिल्लीतून बोलावणं?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भाजप नेते आशिष शेलार यांची सकाळीच उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी या दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघा दिग्गज नेत्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मनसेही भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.

मनसे नेत्यांची देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक पाहायला मिळत आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. इतकंच नाही, तर राज ठाकरेंना भाजपचं केंद्रीय नेतृत्व दिल्लीला बोलावणार असल्याचंही बोललं जात होतं. तसंच देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीत आगामी काळात मनसे महायुतीत सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर लवकरच त्याचं उत्तर मिळेल, आगे आगे देखिये होता है क्या, असं सूचक वक्तव्य करत त्यांनी होकार दिला नाही, पण नकारही दिला नव्हता.
कसबा पेठेची आमदारकी मिळवली, आता खासदारकीचे वेध? ‘धंगेकर पॅटर्न’ पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत
महायुतीत आधीच भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत, त्यात काँग्रेस अशोक चव्हाण यांची भर पडली आहे. यात मनसेच्या रुपाने पाचवा पक्ष सहभागी झाला, तर गर्दी होण्याची शक्यता बोलून दाखवली जाते. एक-एका जागेवरुन रस्सीखेच सुरु असताना मनसेनेही लोकसभेच्या एक ते दोन जागा मागितल्याची चर्चा आहे.
शिवसेनेच्या कार्यक्रमात स्थानिक खासदार भावना गवळीच अनुपस्थित; म्हणतात बिन बुलाये मेहमान, कशी जाऊ?

विचारधारेत फरक नाही

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी “राज ठाकरे आणि आशिष शेलार नेहमी भेटत असतात. वर्षानुवर्ष त्यांच्या भेटीगाठी होत आल्या आहेत. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत, आजही सदिच्छा भेट झाली असावी, त्यातून दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही. कारण निवडणुका नसतानाही भेटी होतात” अशी प्रतिक्रिया दिली. भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात फारसा आयडॉलिजिकल डिफरन्स नाही. दोघांतले संबंध मैत्रीपूर्ण आहेत, ते राजकीय होतील का, याचा निर्णय राज ठाकरे घेतील, असं देशपांडे म्हणाले.

गणपतीला अभिषेक, राज ठाकरेंनी ओझर गणपतीचे दर्शन घेतले

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

भाजपला बेरजेच्या राजकारणात रस

भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, की “भाजपचं बेरजेच्या राजकारणाचं गणित करत आलं आहे, सर्व पक्षातील चांगल्या लोकांना एकत्रित करणं, समाज आणि विकासासाठी काही भूमिका घेणं हे स्वागतार्ह असेल. युतीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. मात्र राज ठाकरे भूमिका निश्चित करतील, त्यावेळी भाजपचं राज्य आणि केंद्रीय नेतृत्व चर्चा करुन तसा निर्णय होऊ शकतो. कुठलाही चांगला नेता, पक्ष सामील झाला तर महायुतीला फायदाच होतो. आजच्या भेटीतून चांगलीच फलश्रुती होईल” असं सूचक उत्तर दरेकरांनी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed