• Sat. Sep 21st, 2024
अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांची राजकीय कार्यक्रमाला हजेरी, पार्थ पवारही सोबतीला

नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आयोजित शिक्षण, आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळावा वाशी येथील सिडको एक्झिबेशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रसेचे अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशअध्यक्ष सुनील तटकरे तसेच राष्ट्रवादीचे डझनभर नेते उपस्थित होते.
हेलिकॉप्टरने फिरू नये असा काय कायदा आहे का? शेतकऱ्यांनो, तुम्हीही हेलिकॉप्टर घ्या : एकनाथ शिंदेठाणे जिल्हातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची धुरा सांभाळणारे अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याकांचा किती पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यातून शक्ती प्रर्दशन करण्याचा प्रयत्न केला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिना भरापासून प्रयत्न केला जात होता. मात्र ह्या मेळाव्यामधून सर्वांच लक्ष वेधले ते जय पवारांनी. अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार हे बारामतीमध्ये सक्रिय असतात. मात्र चक्क आज ते नवी मुंबईतील अल्पसंख्याक मेळाव्यामध्ये दिगग्ज नेत्यांच्या रांगेत बसलेले पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे अनेकांना हा नवखा चेहरा पाहून विश्वास बसेना. मात्र काका पुतण्यामध्ये झालेली फूट पाहता आता अजित पवार हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह राजकीय मैदानात उतरलेले पाहायला मिळतात. त्यामुळे नवी मुंबईतील हा अल्पसंख्याक मेळाव्याचा मुहूर्त साधून जय पवारांना समोर आणल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या काळात सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार असं संपूर्ण कुटुंब पाहायला मिळणार असल्याचे चित्र दिसत असून तशी तयारी देखील अजित पवारांनी केलेली पाहायला मिळते. आगामी निवणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांचे कुटुंब मैदानात उतरले असले तरी येणार काळात काकांनी फिरवलेली भाकरी की अजित पवारांचे कुटुंब हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण; दुसरीकडे उपोषणस्थळी आलेल्या हजारो बांधवांसाठी भाजी-भाकरीची सोय

नवी मुंबईमध्ये घेण्यात आलेल्या अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याला राज्यातील गडचिरोलीपासून सर्वच जिल्हातील लोकांना अल्पसंख्याकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. पण सिडको एक्झिबेशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी जेवढ्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील अर्ध्या खुर्च्या या रिकाम्याच होत्या. त्यात जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पहिल्यासारखा जोश देखील पाहायला मिळाला नाही, त्यात पार्थ पवार हे अगदी शांतपणे सर्वांची भाषणे ऐकत होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर जय पवार हे दिगग्ज नेत्यांसोबत बसले असले तरी ते आगामी निवडणुकीच्या काळात निवडणूक लढवणार का हे वेळ आल्यावरच समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed