• Sat. Sep 21st, 2024

विधानसभेला आमचं काम करतील त्यांचं काम करणार, अंकिता पाटील ठाकरे यांचा सूचक इशारा

विधानसभेला आमचं काम करतील त्यांचं काम करणार, अंकिता पाटील ठाकरे यांचा सूचक इशारा

पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. बारामतीच्या जागेवरील उमेदवार निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मात्र, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी विधानसभेला जे आमचे काम करतील त्यांचेच लोकसभेला आम्ही काम करू, असं म्हटलंय. यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीत पाटील आणि पवार यांच्यात कलगीतुरा सुरु झाल्याचं पाहायला मिळालं.

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा उमेदवार जो असेल त्याचेच काम करावे लागेल असे सातत्याने म्हणणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच जवळपास उमेदवारी निश्चित झाली आहे.मात्र, ज्यांच्या त्रासाला कंटाळून काँग्रेसला रामराम ठोकत भाजप बरोबर घरोबा केलेले इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी आम्ही यापूर्वी महाआघाडीत होतो आता महायुतीत आहोत आघाडीत आहोत, असं म्हटलं.
अजित पवार सुनेत्रा पवार यांचे फोटो असलेल्या फलकावर काऱ्हाटी येथे शाईफेक, बारामती तालुक्यात नेमकं काय घडलं?

अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की, आघाडी असो वा युती त्यांनी तीन वेळेा त्यांनी शब्द दिला आणि नंतर फिरवलेला आहे. त्यांनी आमची फसवणूक केलेली असून आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे जे आमचे विधानसभेला काम करतील त्यांचेच आम्ही लोकसभेला काम करू असा इशारा अंकिता ठाकरे पाटील यांनी दिला.
बारामतीत सुनेत्रा वहिनींचा चित्ररथ, सुप्रिया सुळेंच्या बालेकिल्ल्यातच ‘पवार विरुद्ध पवार’ संघर्षाची चिन्हं

हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी देखील काहींना वाटत असेल की यांना केंद्रीय पद मिळाले आहे. मात्र,२०२४ ची विधानसभा आम्ही लढणारच आहोत अशी माहिती पत्रकार परिषदेत राजवर्धन पाटील यांनी दिली. यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघात पुन्हा पाटील विरुद्ध पवार असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळणार आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News

बारामती लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसकडे

महायुतीच्या जागा वाटपात बारामती लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार असल्याच्या चर्चा देखील सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed