• Sat. Mar 7th, 2026

    …तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी! रामदास कदमांचं थेट आव्हान

    …तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी! रामदास कदमांचं थेट आव्हान

    कोल्हापूर: शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेवर सातत्यानं गद्दारी आणि ५० खोक्यांचे आरोप केले जातात. त्यावरुन कदमांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. शिंदेंसोबत गेलेल्या चाळीसपैकी एकाही आमदारानं ५० खोके घेतलेले नाहीत. ठाकरेंनी आरोप सिद्ध करावेत, असं आव्हान रामदास भाईंनी दिलं आहे.

    शिंदेंसोबत असलेल्या चाळीसपैकी एकाही आमदारानं ५० खोके घेतले असं जर का उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन. पण जर त्यांना आरोप सिद्ध करता आलं नाही तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी, असं थेट आव्हान रामदास कदमांनी ठाकरेंना दिलं आहे. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
    राज्यसभा मिळेना, त्यात आता पंकजा मुंडेंसमोर नवी अडचण; ६१ लाखांचं प्रकरण, नेमका विषय काय?
    पन्नास खोके घेतल्याचं आरोप केले जातात. पण कुठे, कधी, कोणी, कसे, का घेतले ते सांगत नाहीत. यांना फक्त टोमणे मारता येतात. प्रत्यक्षात यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी शिंदेंकडे केली आहे. इकडची चौकशी करण्यापेक्षा, याला त्याला ईडी लावण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना ईडी लावली पाहिजे. आतापर्यंत दिलेले सगळे खोके कुठे गेले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खरा भ्रष्टाचारी कोण आहे ते महाराष्ट्रातील जनतेला कळलं पाहिजे, असंही कदम म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed