म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये बॉम्ब आणि दहशतवादाबाबत खोटी माहिती देण्याचे कॉल सुरूच आहेत. बुधवारी डोंगरी येथील दर्ग्यात दहशतवादी घुसल्याची माहिती देऊन पोलिस मदत मागविण्यात आली. या निनावी फोनमुळे पोलिस यंत्रणा कामाला लागली. मात्र ही अफवा असल्याचे समोर येताच पोलिसांनी खोटी माहिती देणाऱ्या ७३ वर्षांच्या वृद्धाला अटक केली. त्याने ही माहिती नेमकी कशासाठी दिली, याचा तपास पोलिस करत आहेत.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात १४ फेब्रुवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास एक फोन आला. डोंगरी येथील बाबा दर्ग्यात काही बंदूकधारी दहशतवादी घुसले असून पोलिसांच्या मदतीची गरज आहे, असे सांगण्यात आले. मुख्य नियंत्रण कक्षातून याबाबत डोंगरी पोलिसांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डोंगरी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. दर्ग्याची तसेच आजूबाजूच्या परिसराची पाहणी करण्यात आली. संशयास्पद असे काहीच आढळले नाही.

दहशतवाद्यांबाबत खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान हा फोन डोंगरी येथील एका पीसीओमधून करण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी पीसीओचालकाकडे माहिती घेतली असता त्याने फोन करणाऱ्या वृद्धाचे वर्णन सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे भगवान भापकर उर्फ नजरुल इस्लाम शेख याला अटक केली.