• Mon. Nov 25th, 2024
    सचिन कुठेय? आज त्याला संपवायचेच, गावगुंडांचा उपसंरपंचाच्या घरावर हल्ला, नेमकी घटना काय?

    धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सावळदे गावात ”पत्ते खेळू नका” असं बोलण्याचा राग आल्याने गावगुंडांनी सावळदे गावाच्या उपसरपंचांच्या घरावर हल्ला करुन हैदोस घातल्याची घटना घडलेली आहे. यावरुन शिरपूर तालुक्यात गुंडाराज तर सुरु नाही ना? अशी शंका सर्वसामान्य जनतेला येऊ लागली आहे. याबाबत शिरपूर तालुक्यासह सावळदे गावात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

    गावात शांतता राहावी याची जबाबदारी ही सरपंच व उपसरपंच याची असते. तसेच गावात शांतता नांदावी व तरुण कुठल्याही व्यसनाला लागू नये, गावात अवैद्य धंदे चालू नये यासाठी ग्रामपंचायती स्वतंत्र समिती असते आणि या समितीवर नियंत्रण ठेवण्याचे काम सरपंच उपसरपंच असते. मात्र, शिरपूर तालुक्यातील सावळदे गावात उलटच घडलं तरुणांना पत्ते खेळू नका, असं सांगितल्याच्या वादातून उपसरपंच सचिन राजपूत यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केला असल्याची घटना घडली.
    चिपळूणमध्ये राणे-ठाकरे समर्थकांमध्ये मोठा राडा, निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक
    शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील उपसरपंच सचिन राजपूत यांनी थाळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, मुकेश उर्फ पप्पू कोळी, नारायण उर्फ गेंद्या भिल यांना गावात पत्ते खेळू नका अशी समज दिली असता त्याचा राग अनावर झाला. त्यात दोघांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह अचानक उपसरपंचाच्या घरात घुसले व जोरजोरात आरडाओरड करुन ”सचिन कुठे आहे. त्याला आज संपवायचेच” असं बोलू लागले. यानंतर त्यानी घरातील संसारोपयोगी साहित्य इकडे तिकडे फेकण्यास सुरवात केली.

    घरात असलेल्या श्रीपाल याने हल्लेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याला नारायण भिल व गणपत भिल यांनी दाबून धरत त्याच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून घेतली. या प्रकरणी थाळनेर पोलीस स्टेशनमध्ये वरील गुंडांसह अज्ञात चार-पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, शांततेच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्यात परिचित असलेल्या शिरपूर तालुक्यात दिवसेंदिवस गुंडगिरी वाढत असून या गुंडांना कायद्याचा धाकच उरला नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *