• Sat. Sep 21st, 2024
रात्री पालकांसोबत जेवला अन् रुममध्ये गेला; सकाळी सर्वांनाच बसला धक्का, काय घडलं?

जळगाव: जेईई मेन परीक्षेत कमी गुण मिळाल्याने जळगाव शहरातील मेहरूण येथील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवार, १४ फेब्रुवारी रोजी समोर झाली आहे. यश गणेश खर्चे (१८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. यश हा मेहरुण परिसरातील जोशीवाडा येथे आई, वडील, बहिणीसह वास्तव्याला होता. मेहरुणमधीलच यश खर्चे हा मेहरुणमधील राज विद्यालयात इयत्ता बारावीचे शिक्षण घेत होता. त्याने या वर्षी जेईई मेन्स परीक्षा दिली होती.
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच रक्तरंजित खेळ; त्याच्यामुळेच प्रेयसीचा अबोला, मित्र कारण ठरला, रागात डाव साधला
या परीक्षेचा निकाल काल मंगळवारी (दि.१३) लागला. परीक्षेत त्याला अपेक्षित गुण मिळाले नाहीत. अत्यंत कमी गुण मिळाल्याने तो निराश झालेला होता. रात्री कुटुंबीयांसह त्याने जेवण केले. त्यानंतर वरच्या मजल्यावर गेला. सकाळी आई उठवण्यासाठी गेली. बराच वेळ आवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी यश गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला. तात्काळ शेजारच्यांच्या मदतीने यश याला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले.

राहुल गांधींनी संपर्क केला का? पत्रकारांचा सवाल, अशोक चव्हाण काय म्हणाले?

वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. जेईई मेन्स परिक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याचे मामा महेंद्र सोनवणे यांनी सांगितले. त्याच्या मृत्युमुळे आई-वडिलांनी फोडलेला टाहो उपस्थितांचे हृदय हेलावणारा होता. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed