• Sat. Sep 21st, 2024
गृहमंत्री अमित शाह १५ फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

निलेश पाटील
जळगाव: भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शाह जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात जळगाव दौऱ्यावर येणार असल्याचं सांगितले जात आहे. मात्र, त्याआधीच अमित शहा जळगावात येत आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जळगावात युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी आज रविवारी जामनेरात बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
आर्थिक संकटापुढे मानली हार अन् उचललं टोकाचं पाऊल; नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनं हळहळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभाव्य दौरा जळगाव येथे होणार होता. या पार्श्वभूमीवर जळगाव येथील जामनेर रस्त्यावर असलेल्या चाळीस एकरच्या जागेवर पंतप्रधान मोदींच्या जाग दौऱ्याची तयारी प्रशासनाकडून सुरू होती. मात्र दौरा निश्चित नसल्यामुळे प्रशासनाकडून होणारी तयारी थांबवण्यात आली. मोदी हे युवा संमेलन मेळावा घेणार होते. मात्र त्यांचा दौरा निश्चित नसल्याने भाजपाचे नेते तथा गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा १५ फेब्रुवारी रोजी निश्चित झाला असल्याचे गिरीश महाजन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जळगावात युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते ३५ वयोगटापर्यंत युवकांशी अमित शहा संवाद साधणार आहे. युवकांच्या समस्या ते या युवा संमेलनातून जाणून घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी आज जामनेरात येथे बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले होते. अमित शहा जळगावात आल्यावर युवकांच्या प्रश्नांवर लक्ष देतील, अशी अपेक्षा युवकांमध्ये आहे. देशात वाढती बेरोजगारी बघता युवक या युवा संमेलनामध्ये कितपत सहभागी होतो हे बघणं देखील महत्त्वाचे आहे.

आमदार बांगरांनी राम मंदिराच्या प्रतिकृतीची सोन्याची अंगठी, बाळासाहेब आणि एकनाथ शिंदेंच्या प्रतिमेचं लॉकेट बनवलं

असे आहे दौऱ्याचे नियोजन

१५ फेब्रुवारी रोजी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून जळगावसह अकोला आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. अमित शाह यांच्या उपस्थितीत जळगावात मोठे युवा संमेलन घेण्यात येणार आहे. या संमेलनातून ते जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधणार आहेत. अमित शाह यांचा दौरा, तसेच संमेलनाच्या नियोजनासाठी रविवारी जामनेरात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed