• Mon. Nov 25th, 2024
    पुणे पोलिसांकडून गुंडांची झाडाझडती, सत्ताधाऱ्यांची अडचण वाढवणारं वडेट्टीवारांचं ट्विट

    पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख आणि या टोळ्यांतील गुंडांची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी परेड घेतली. टोळीयुद्धातून एकमेकांच्या जीवावर उठणारे हे गुन्हेगार पोलिस आयुक्तालयाच्या आवारात रांगेत उभे होते. सर्व गुन्हेगारांची परेड घेऊन कायदा मोडल्यास कठोर कारवाईची त्यांना तंबी देण्यात आली. पोलीस आयुक्तालयात गुंड गजानन मारणे, बाबा बोडके, नीलेश घायवळ, सचिन पोटे यांच्यासह ३०० गुंडांची चौकशी करून त्यांना समज देण्यात आली. नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांची झाडाझडती घेण्याच्या आदेश गुन्हे शाखेला दिलेले होते. कालच्या सगळ्या घटनेवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करून शासन आणि पोलिसांना जळजळीत सवाल केला आहे.

    सत्ताधाऱ्यांची अडचण वाढवणारं वडेट्टीवारांचं ट्विट

    अट्टल गुंडांनी मंत्रालयात येऊन बनवलेला रील ट्विट केल्यानंतर पुणे पोलीस जागे झाले. गुंडांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून व्हिडिओ बनवू नका हा दम भरला, गुंडांची परेड घेतली…. खूप छान काम करताय पुणे पोलिस… असा टोमणा वडेट्टीवारांनी पुणे पोलिसांना मारला.

    त्यापुढे वडेट्टीवार ट्विटमध्ये म्हणतात, स्वतःला समाजसेवक म्हणून मिरवणारे गुंड मंत्रालयात, वर्षा बंगल्यावर ज्यांना भेटायला गेले होते त्यांची परेड पुणे पोलिस कधी घेणार? असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी पोलिसांना विचारून राजकीय नेत्यांच्याही अडचण केलीये.

    बंदुका कोयता चालवणाऱ्या हातांची घडी, भल्या भल्या भाईंचा नांगा ठेचला, पोलिसांसमोर सगळ्या गँग आमनेसामने
    कुख्यात गुंड आणि राजकारण्यांच्या भेटी

    पुण्यातील गँगस्टर गजा मारणे, नीलेश घायवळ, आसिफ दाढी, हेमंत दाभेकर… या चारही रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्र्याचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे; तसेच उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या घेतलेल्या भेटीमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले.

    संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा ‘नागपूर पॅटर्न ’

    संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा ‘नागपूर पॅटर्न ’ पुण्यात राबविण्याचा निर्णय पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतला आहे. त्यांनी गुन्हे शाखेला यासंदर्भात सूचना केल्या.

    त्यांच्या सूचनांची गंभीर दखल घेऊन गुन्हे शाखेने २६७ गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयात बोलावून घेतले. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर आणि सुनील तांबे यांनी हजर असलेल्या गुंडाची झाडाझडती घेतली. गुन्हेगारीपासून परावृत्त व्हा, कोणत्याची प्रकारे रील बनवू नका, अशी तंबी त्यांना देण्यात आली.

    Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळ कोण आहे? पुण्यात त्याची दहशत का आहे? वाचा…

    गुन्हेगारांकडून ‘डोझिअर फॉर्म’ भरून घेण्यात आला

    त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती, व्यवसाय, मित्रपरिवार, राजकीय संबंध अशा माहितीचा ‘डोझिअर फॉर्म’ भरून घेण्यात आला. पोलिस आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे गुन्हेगारी टोळ्यांना समोरासमोर बोलावून दम दिल्याचे दिसून आले.

    रिल्स टाकले तर थेट तडीपार; अमितेश कुमारांची शेवटची वाॅर्निंग, रांगेत गजा मारणेही हात बांधून उभा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *