• Mon. Nov 25th, 2024
    काकीने आयुष्य संपवलं, २५ वर्षीय पुतण्यानेही जीवनाची दोर कापली, पुण्यातील घटनेने खळबळ

    शिरूर, पुणे : शिरुर तालुक्यात एक मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. चुलतीने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर काही तासात पुतण्याने देखील आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

    कल्पना रवींद्र शिंदे (वय ३१) आणि सचिन दौलत शिंदे (वय २५) अशी आत्महत्या केलेल्या काकी-पुतण्याची नावे आहेत. यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेने शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी दौलत ज्ञानदेव शिंदे व गोविंद ज्ञानदेव शिंदे (दोघेही रा. गणेगाव दुमाला, ता. शिरूर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला गाव परिसरात असलेल्या संगमेश्वर वस्ती येथे कल्पना रवींद्र शिंदे तसेच सचिन शिंदे हे कुटुंबियांसोबत राहत होते. मात्र रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणातून कल्पना यांनी घरातील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

    स्वतःच्याच पत्नीचे कॉल रेकॉर्ड काढणं महागात, मुंबईतील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची विभागीय चौकशी
    घटना समजल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. ही घटना होते न होते तोच सोमवारी पहाटेच्या सुमारास कल्पना यांचा पुतण्या सचिन दौलत शिंदे याने देखील घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात हादरला होता. यांनी आत्महत्या का केली याची माहिती समोर आली नाही.

    दहावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, पिंपरीत अकॅडमीच्या संचालकाला बेड्या

    याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात दौलत शिंदे व गोविंद शिंदे यांनी माहिती दिली आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा अधिक तपास शिरूर पोलिस करत आहेत.

    नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed