• Mon. Nov 25th, 2024
    भाजपचं मिशन लोकसभा, मुंबईकरांना घडवणार रामलल्लांचे दर्शन; अयोध्येसाठी ट्रेन रवाना

    मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अयोध्या धाम जंक्शनसाठी आज, सोमवारी रात्री १०.३५ वाजता आस्था विशेष रेल्वे रवाना होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सीएसएमटी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिशन अयोध्या आखलेलं आहे. त्याअनुषंगाने भारतीय जनता पक्ष मुंबईकरांना रामलल्लांचं दर्शन घडविणार आहे.

    तरुण विहीर मागायला गेला, भाजप आमदाराने अपमान केला; कथित Audio Clip व्हायरल
    ३५ तासांच्या प्रवासानंतर विशेष रेल्वे अयोध्येत पोहोचणार आहे. रेल्वेगाडीची आसनक्षमता १३०० इतकी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅंड टुरिझम कॉर्पोरेशनच्या माध्यमाने (आयआरसीटीसी) फुल टेरिफ रेटनूसार (एफटीआर) २२ शयनयान डब्यांच्या रेल्वेगाडीचे आरक्षण करण्यात आले आहे. दरम्यान सोमवारी देवभूमी हिमाचल प्रदेशमधून पहिली आस्था विशेष ट्रेन अयोध्येसाठी रवाना झाली असून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला.

    एक माझा उद्धव… सॉरी…एक माझा वैभव आणि मी…; भास्कर जाधव म्हणाले, मला सभा थांबवावी लागेल

    मुंबई लोकसभा क्षेत्रातील रेल्वेगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे येथून रवाना होणार आहे. नाशिक, पुणे, नागपूर अशा रेल्वे स्थानकांतून संबंधित लोकसभा क्षेत्रातील रेल्वेगाड्या धावणार आहेत. रेल्वेमंडळाने देशातील सर्व क्षेत्रीय रेल्वेला अयोध्येसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी विशेष शुल्क आकारण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रीय रेल्वेगाडयांचे नियोजन पूर्ण झाल्यावर लवकरच रेल्वेगाड्यांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, असे रेल्वे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed