• Thu. Sep 17th, 2026
तरुण विहीर मागायला गेला, भाजप आमदाराने अपमान केला; कथित Audio Clip व्हायरल

अक्षय शिंदे, जालना : जालन्यातील बदनापुरचे भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्याकडे विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिफारस घेण्यासाठी गेलेल्या उच्चशिक्षित तरुणाला ”तू दारु पिऊन आला का?, तुझ्या अंगाचा वास येतो? असं म्हणत त्यांच्याच मतदार संघातील एका तरुणाला अपमानजनक वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. असा दावा तरुण प्रताप कवाळे याने केलाय. आमदार आणि या तरुणाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“२ फेब्रुवारी रोजी भाजप आमदार नारायण कुचे यांच्या बदनापूर येथील कार्यालयात विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिफारस घेण्यासाठी गेलो होतो. मला त्यांनी तू दारू पिऊन आला का? तुझ्या अंगाचा वास येत आहे”, असं म्हणत तेथे जमलेल्या लोकांसमोर अपमान केल्याचा या तरुणाने जालन्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटलंय. या तरुणाने जालना जिल्हा भाजप अध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्याकडे तक्रारीद्वारे आमदार नारायण कूचेंवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथील तरुण प्रताप कवाळे आणि भाजप आमदार नारायण कुचे यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

अजितदादा इस्लामपुरात आले-जयंतरावांविरोधात न बोलता गेले, सांगलीत चर्चांना उधाण
मताच्या वेळेस आमचा वास येत नव्हता का?

आम्ही सगळ्यांनी तुम्हाला मनातून मतदान दिलं आहे. आम्ही दुवा करतो की परत तुम्ही यावेत. पण तुम्ही तर आमचा अपमान केलाय. गरीबाचा अपमान करायचा, मताच्या वेळेस आमचा वास येत नव्हता का? असा संतप्त सवाल या तरुणाने आमदार नारायण कुचे यांना केला.

माझ्या मुलाचा अपमान का केला? तरुणाच्या आईचा आमदारांना प्रश्न

माझ्या शेतात विहीर आहे का? येऊन बघा ना, माझ्या मुलाचा तिथे अपमान का केला? कोण म्हणतंय माझा मुलगा दारू पितो? असं म्हणत तरुणाच्या आईने आमदार नारायण कुचे यांना थेट फोनवर जाब विचारला आहे.

‘भीमराज की बेटी मैं तौ जयभीमवाली हूँ’ फेम गायिका किरण पाटणकर यांचे निधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed