रामदास आठवलेंनी आपल्या भाषणाची सुरुवात कवितेने केली.”मला नाही कशाची हाव म्हणूनच मी आलोय शिर्डी कोपरगाव, मी घालत असतो अन्यायावर घाव, उलटून टाकतो दुश्मनाचा डाव, मी घेऊन माझ्या भिमाची आन, मजबूत करणार बाबासाहेबांचे संविधान, मला आहे दलित चळवळीचा भान वय आली तर बाबासाहेबांसाठी देणार जान अशी कविता आठवले यांनी केली.
माझ्या लग्नावेळी अनेकांनी लाडू खाल्ले, कारण लाडू देणारे होते शंकरराव कोल्हे. अबकी बार ४०० पार इंडियाची आघाडीची होणार हार अशा शब्दात आठवलेंनी कविता सादर करत आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत मोदींचे कौतुक केले. मंचावर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या.
.. तोपर्यंत इंडिया आघाडी मोदींना रोखू शकत नाही
देशात इंडिया नावाची आघाडी नरेंद्र मोदींच्या विरोधात उभी आहे. मोदींच्या विकासाचा रथ रोखण्यासाठी ते थांबलेले आहेत. पण मी इंडिया आघाडीवाल्यांना सांगतो जोपर्यंत हा आठवले पठ्ठ्या मोदींसोबत आहे तोपर्यंत तुम्हाला त्यांचं रथ अजिबात अडवता येणार नाही अशा शब्दात आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी इंडिया आघाडीवर टीका केली असून मोदींच्या कार्याचे भरभरून कौतुक केले आहे.
राहुल गांधींनी काँग्रेस जोडो यात्रा काढावी
राहुल गांधींनी काँग्रेस जोडो यात्रा काढावी भारत जोडण्यासाठी मोदी आणि आम्ही सक्षम आहे. पहिले काँग्रेस सोडून गेलेल्या लोकांना पक्षात आणा आणि पक्ष मजबूत करा नंतर भारत जोडो यात्रा काढा असा टोला मारत आठवलेंनी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवर टीका केली आहे.
आघाडीला कंटाळून उद्धव ठाकरे परत येतील
घराणेशाहीवर उध्दव ठाकरेंनी टीका करणे योग्य नाही. मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या मुलाला त्यांनी मंत्री केले होते. उध्दव ठाकरे परत युतीत आले तर त्यांचं स्वागतच आहे.
आम्ही त्यांना सोडलं नव्हतच.त्यांनीच आम्हाला सोडलं.त्यांनी आता एकट्याने राहून उपयोग नाही. सगळे आमदार इकडे आलेलेच आहेत. मात्र आज ना उद्या आघाडीला कंटाळून ते परत येतील असा आम्हाला विश्वास असल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे.
शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक
यापूर्वी विखे पाटील व पिचड यांच्याशी चर्चा सुधा झाली. मात्र आता एकनाथ शिंदेंसोबत विद्यमान खासदार आल्याने टेक्निकल अडचण आहे.शिर्डीची जागा भाजपला मिळाल्यास मी उमेदवार असू शकतो. मात्र अंतिम निर्णय सर्वांना विचारात घेऊन केला जाईल. आरपीआय शिर्डीसाठी आग्रही राहील असं देखील आठवलेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांची ताकद
प्रकाश आंबेडकर ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रात माझ्या प्रमाणे त्यांच्या पक्षाचीसुद्धा ताकद आहे. त्यांनी अनेक वेळा सांगितलं मी शिवसेनेसोबत आहेत.आघाडीत त्यांना घेतील की नाही सांगता येत नाही आणि ते जातील का नाही हे सुद्धा सांगता येत नाही. चारही पक्षांना प्रत्येकी १२ जागा हा आंबेडकर यांचा फॉर्म्युला महाविकास आघाडीने मान्य करावा. आंबेडकर आघाडीत गेले तरी महायुतीला फटका बसणार नाही असं आठवले म्हणाले.