• Mon. Nov 25th, 2024
    हवाई प्रवासादरम्यान प्रवाशाला मिरगीचा झटका; विमानाचे आपत्कालीन लॅण्डिंग, व्यक्तीवर उपचार सुरू

    नागपूर: विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक व्हीके८२९ या विमानाने दिल्लीहून हैदराबाद प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला हवाई प्रवासादरम्यान गुरुवारी मिरगीचा झटका आला. प्रवाशाची बिघडलेली प्रकृती पाहता विमान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळविण्यात आले. सध्या या प्रवाशावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात किम्स-किंग्ज्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    संभाजीराजे छत्रपतीचे ट्विट चर्चेत; #LokSabha2024 हॅशटॅग वापरत स्पष्ट केली भूमिका
    मिळालेल्या माहितीनुसार, विनय कुमार गोयल (४४) असे या प्रवाशाचे नाव आहे. गोयल हे विस्तारा एअरलाइन्सने हैदराबाद येथे जात होते. दरम्यान, त्यांना मिरगीचा झटका आला. यामध्ये त्यांचा खांदा निखळला. तसेच जीभ दाताखाली चावल्या गेली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे विमानाचे आपात्कालीन लॅण्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधत आपत्कालीन लॅण्डिंग झाले. विमानतळावर तैनात असलेल्या किम्स-किंग्ज्वे रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूने प्राथमिक तपासणी करून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. सध्या गोयल यांच्यावर मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. प्रतीक उत्तरवार यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू आहे.

    हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या, भुजबळांचं जरांगेंना आव्हान

    याबाबत अधिक सांगताना डॉ. उत्तरवार म्हणाले,‘गोयल यांना मेंदूशी संबंधित इडिओपॅथीक इंट्राक्रॅनिअल हायपरटेन्शन (आयआयएच) हा आजार आहे. त्यावर चंदीगड येथे गोयल उपचार घेत आहेत. दरम्यान, हवाई प्रवास करताना त्यांना अचानक फिट्स आल्यात आणि त्यांची प्रकृती खालावली. इस्पितळात दाखल करण्यात आले तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते. येथे त्यांचे स्कॅनिंग करण्यात आले असून मेंदूच्या नसेत क्लॉट असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार, त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. सध्या प्रकृती स्थिर असून परवा सुट्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वैद्यकीय कारणाने आपात्कालीन लॅण्डिंग झालेले हे विमान काही वेळाने उर्वरित प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे रवाना झाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed