• Sat. Sep 21st, 2024
बायकोला संशयातून घरातच संपवलं, कुलूप लावून पसार, दोन दिवसांनी डेक्कनजवळ पतीची बॉडी सापडली

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पती-पत्नीत सातत्याने होणाऱ्या भांडणातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना जनवाडी येथे घडली. त्यानंतर पत्नीचा मृतदेह घरात टाकून पसार झालेल्या पतीचा मृतदेह डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडला. त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. रेश्मा चंदर पंतेकर (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, चंदर पंतेकर (वय ३३, दोघेही रा. जनवाडी) असे मृत पतीचे नाव आहे.

खुनाची घटना २४ जानेवारीला सकाळी साडेसातपूर्वी घडली. मयत रेश्मा यांचा भाऊ राहुल मंजाळकर (वय २४, रा. सुतारवाडी) याने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चंदर याच्या विरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, पालघरमधील घृणास्पद प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार याची बहीण रेश्मा आणि आरोपी चंदर हे पती-पत्नी आहेत. आरोपीला दारूचे व्यसन होते. त्यावरून गेल्या महिन्यापासून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. आरोपीने पत्नीवर संशय घेवून तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर घराला बाहेरून कडी आणि कुलूप लावून तेथून पळ काढला. मयताचा शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात गळा आवळून खून केल्याचे समोर आले. चतु:शृंगी पोलिस चंदर याचा शोध घेत असताना, डेक्कन पोलिसांना चंदरचा मृतदेह सापडून आला. डेक्कन पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे.

लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर पुरुषाचं आयुष्य, बीडचा हवालदार ललित साळवे झाला ‘बापमाणूस’

पुलाचीवाडी येथे २६ जानेवारीला सापडला मृतदेह

२६ जानेवारीला सकाळी नऊ वाजता पुलाची वाडी येथील गुंजाळ कॉम्प्लेक्स येथे पार्किंगमध्ये एक व्यक्ती बेशुद्धावस्तेत असल्याची माहिती शहर पोलिसांच्या ११२ हेल्पलाइनवर प्राप्त झाली. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी त्या ठिकाणी जावून बेशुद्धावस्थेतील व्यक्तीला रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. पोलिसांनी माहिती मिळवली असता, मृत व्यक्ती चंदर पंतेकर असल्याचे समोर आले. त्याच्या भावाने डेक्कन पोलिसांना दिलेल्या जबाबात चंदरने चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या पत्नीचा खून केल्याची माहिती दिली.

नवरा-बायकोमध्ये सतत भांडणे होत होती. त्यातून नवऱ्याने बायकोचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आक्समिक मृत्युची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला होता. मयतेच्या भावाच्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू असतानाच, पतीचा मृतदेह सापडल्याची बातमी आली.

अंकुश चिंतामणी (वरिष्ठ निरीक्षक, चतु:शृंगी पोलिस ठाणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed