• Mon. Nov 25th, 2024
    ईडीविरोधात राष्ट्रवादीचे धुळ्यात आंदोलन; रोहितदादांना फसवण्याचं भाजपाचं कारस्थान

    धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीमार्फत समन्स देऊन चौकशीला बोलवण्यात आले. त्याविरोधात धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर ईडी व भाजपाचा तीव्र शब्दांत निषेध करून धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

    आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व आहे. त्यांची सामाजिक, राजकीय क्षेत्रांत सेवा आहे. त्यांनी गेल्या महिन्यात राज्यात युवा संघर्ष यात्रा यशस्वीरीत्या सुरू केली. त्यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्रातील युवाशक्ती एकवटली आहे. वाढती लोकप्रियता बघून भाजप सरकारने हेतूपुरस्कृत आमदार पवार यांच्यामागे ईडीची चौकशी लावली आहे. कुठलाही गैरव्यवहार नसताना राजकीय उद्देशाने ईडीतर्फे समन्स बजावण्यात आला आहे. ईडी चौकशीचा धाक दाखवून विरोधकांना संपवण्याचे कट – कारस्थान भाजपा, एकनाथ शिंदे, अजित पवार करत आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला.

    मनोज जरांगे मनुवादी, उदयनराजे आणि सरदारांच्या घराण्यांना कुणबी सर्टिफिकेट देणार का? : लक्ष्मण माने
    भाजप व युती सरकार ईडीसारख्या यंत्रणेचा गैरवापर करून हुकूमशाही पद्धत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. आज राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते मुंबईत ईडी कार्यालयासमोर आंदोलन करत आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सत्ताधारी भ्रष्ट मंत्र्यांमागे सुरु असलेली ईडी चौकशी पुन्हा सुरु करावी. आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशी विरोधात निषेध करून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप व एक फुल, दोन हाफ सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

    पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप, खेळाडूंनी बंड करण्यासाठी सुरु केलं भन्नाट प्लॅनिंग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *