मुंबई पुणे ते कोल्हापूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी महालक्ष्मी एक्स्प्रेस ही महत्वाची गाडी आहे. आतापर्यंत ही गाडी इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) कोच असलेल्या रेकसोबत धावत होती. आता या गाडीला सुरक्षित समजला जाणारा आयसीएफ कोच रेल्वे बोर्डाने दिला आहे. त्यामुळे ही गाडी २५ जानेवारीपासून नव्या कोचसह धावणार आहे. त्यामुळे मुंबई कोल्हापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. २५ जानेवारी रोजी स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये गाडीला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. यावेळी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर नव्याने बांधण्यात आलेल्या लिफ्टचे उद्घाटन केले जाणार आहे.
सातारा कोल्हापूर विभागाची पाहण
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव हे बुधवारी सातारा ते कोल्हापूर विभागाची पाहणी करणार आहेत. या विभागात झालेली कामे व स्थानक याची यादव पाहणी करणार आहेत. यावेळी प्रवासी सेवेच्या दृष्टीकोनातून उपाययोजनांचा आढावा ते घेणार आहेत.
दरम्यान, कोल्हापूर-मुंबई- कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसला एलएचबी कोच जोडल्यामुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे. आयसीएफ कोचच्या एका डब्यात ७२ प्रवासी प्रवास करु शकत होते. आता एलएचबी कोचमधून ८० प्रवासी प्रवास करु शकतात. यामुळं प्रवासी संख्येत देखील वाढ होणार आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसला प्रवाशांचा कायम मोठा प्रतिसाद मिळत असतो.
Read Latest Maharashtra News And Marathi News